Join us  

२४ चेंडूंत ११२ धावा! मुंबईचा यशस्वी जैस्वाल मुंबई इंडियन्सला एकटा नडला, RRने धावांचा डोंगर उभा केला

IPL 2023, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीगचे हे १६ वे पर्व आहे आणि आज वानखेडेवर या प्रवासातील १००० वा सामना खेळला जातोय...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 9:26 PM

Open in App

IPL 2023, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीगचे हे १६ वे पर्व आहे आणि आज वानखेडेवर या प्रवासातील १००० वा सामना खेळला जातोय... युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal ) आज मुंबई इंडियन्सवर एकटा भारी पडला. राजस्थान रॉयल्सच्या या सलामीवीराने एकट्याने दमदार फटकेबाजी करताना MIच्या मोठ मोठ्या गोलंदाजांना चोपले. त्याने ५३ चेंडूंत शतक पूर्ण केले. यंदाच्या आयपीएलमधील तो तिसरा शतकवीर ठरला. रोहित शर्माला त्याने बर्थ डे गिफ्टच दिले. 

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या सामन्यापूर्वी IPL ने या माइलस्टोनचे यश साजरे केले. रोहित शर्माचा आज वाढदिवस असल्याने हा सामना जिंकून त्याला गिफ्ट देण्याचा MIचा निर्धार आहे.  RR ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जोफ्रा आर्चरच्या पुनरागमनामुळे RRला हा निर्णय महागात पडेल असा अंदाज अनेकांचा होता. पण, युवा फलंदाज यशस्वी जैस्वालाने सर्व अंदाज व्यर्थ ठरवले. त्याने मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आणि जॉस बटलरसह पहिल्याविकेटसाठी ७.१ षटकांत ७२ धावा जोडल्या. अनुभवी गोलंदाज पियूष चावलाने RRच्या बटलरला १८ धावांवर बाद केले. त्यानंतर आलेला संजू सॅमसनने पहिलाच चेंडू प्रेक्षकांमध्ये भिरकावून दिला. 

पण, अर्शद खानने RRच्या कर्णधाराला १४ धावांवर झेल देण्यास भाग पाडले. यशस्वीने आणखी एक अर्धशतक झळकावले, परंतु चावलाने RRच्या देवदत्त पडिक्कलचा ( २) दांडा उडवला. जेसन होल्डरला आज फलंदाजीला वरच्या क्रमांकावर पाठवले गेले आणि त्यानं षटकार खेचून चाहत्यांना खूश केले. पण, जोफ्रा आर्चरने दुसऱ्या स्पेलमध्ये होल्डरची ( ११) विकेट मिळवून दिली. यशस्वी एका बाजूने चांगला खेळ करत होता आणि RRच्या १५ षटकांत ४ बाद १४३ धावा झाल्या होत्या.  त्याने आयपीएल कारकीर्दितील सर्वोत्तम धावसंख्या आज उभारली. शिमरोन हेटमायर ( ८) व ध्रुव जुरेल ( २) हेही आज मोठी खेळी करू शकले नाही. 

यशस्वीने ५३ चेंडूंत शतक पूर्ण करताना १३ चौकार व ६ षटकार खेचले. आयपीएलमध्ये शतक झळकावणारा तो पाचवा अनकॅप्ड फलंदाज ठरला. यापूर्वी मनीष पांडे, पॉल व्हॅल्थॅटी, देवदत्त पडिक्कल व रजत पाटीदार यांनी ही किमया केली. यशस्वी ६२ चेंडूंत १२४ धावांवर बाद झाला. अनकॅप्ड फलंदाजांमधील ही सर्वोत्तम खेळी ठरला. त्याच्या या खेळीत १६ चौकार व ८ षटकारांचा समावेश होता. राजस्थानने ७ बाद २१२ धावा केल्या.  

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्स
Open in App