Join us  

ते ७० चेंडू....! मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफ मार्गाचं अवघड गणित, जाणून घ्या RCBसाठीचं समीकरण

IPL 2023, Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Marathi : उरलेल्या १ जागेसाठी मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या ३ संघांमध्ये शर्यत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 3:18 PM

Open in App

IPL 2023, Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Marathi : गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चा क्वालिफायर १ सामना होणार आहे. लखनौ सुपर जायंट्सने शनिवारी थरारक विजयाची नोंद करून प्ले ऑफमध्ये जागा पक्की केली आहे. आता उरलेल्या १ जागेसाठी मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या ३ संघांमध्ये शर्यत आहे. मुंबई इंडियन्सने रविवारी घरच्या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यांचा नेट रन रेट हा RCB पेक्षा कमी असल्याने त्यांना केवळ विजय पुरेसा नाही, तर प्ले ऑफचं गणिताचं समीकरण पूर्ण करावं लागेल.

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू त्यांचा अखेरचा साखळी सामना जिंकून प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. पण, RCB चा रन रेट ०.१८० असा आहे आणि MI चा -०.१२८ असा आहे. त्यामुळे मुंबईला सनरायझर्स हैदराबादवर मोठा विजय मिळवाला लागेल आणि त्याचवेळी RCBचा GTकडून पराभवाची वाट पाहावी लागेल. राजस्थान रॉयल्सचे १४ सामने झाले असले तरी तेही अजून स्पर्धेत आहेत. उद्या मुंबई व बंगळुरू या दोघांचाही पराभव झाल्यास त्यांचा नेट रन रेट कमी होईल. अशा परिस्थितीत ०.१४८ नेट रन रेट व १४ गुण असलेल्या RRलाही संधी मिळू शकते.

मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी केली असती तर त्यांनी १६५ किंवा त्यापेक्षा कमी धावा केल्या असत्या तर त्यांना ८१ किंवा त्यापेक्षा अधिक धावा राखून विजय मिळवावा लागला असता. तेच १६६ ते २०० धावा केल्यानंतर त्यांना ८२ पेक्षा अधिक धावा राखून जिंकणे महत्त्वाचे असते.

पण, आता ते लक्ष्याचा पाठलाग करणार आहेत आणि त्यासाठी त्यांना १५०-२०० धावांचा यशस्वी पाठलाग करावा लागेल किंवा ७० - त्यापेक्षा अधिक चेंडू राखून लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. तर त्यांचा नेट रन रेट RCB पेक्षा चांगला होईल. 

MI ने ८ षटकांत लक्ष्याचा पाठलाग केल्यास, RCBला ४० धावांनी विजय मिळवावा लागेल. MI ने १० षटकांत लक्ष्याचा पाठलाग केल्यास RCBला २० धावांनी जिंकावे लागेल. मुंबईने१२ षटकं लावली, तर RCBला प्ले ऑफसाठी केवळ विजय पुरेसा आहे.  

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबाद
Open in App