IPL 2023, Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Marathi : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३मध्ये अखेरच्या साखळी सामन्यात विजयाची नोंद केली. सनरायझर्स हैदराबादने विजयासाठी ठेवलेल्या २०१ धावांचा पाठलाग करताना कॅमेरून ग्रीन व रोहित शर्मा यांनी १२८ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. प्ले ऑफच्या शर्यतीत मुंबईला विजय मिळवणे गरजेचा होताच, परंतु रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूपेक्षा चांगला नेट रन रेट करण्यासाठी त्यांना ही मॅच लवकर संपवणे गरजेचे होते. त्यांनी दणदणीत विजय मिळवून प्ले ऑफची 'चौथी सीट' मिळवण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं... RCB vs GT यांच्यातला बंगळुरू येथे होणारा सामन्यात पावसाची फलंदाजी सुरू असल्याने मुंबईच्या आशा उंचावल्या आहेत. मुंबई चौथ्या क्रमांकावर आला, परंतु त्यांचा नेट रन रेट अजूनही -०.०४४ असा आहे.
हैदराबादने ५ बाद २०० धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूपेक्षा चांगला नेट रन रेट करण्यासाठी मुंबईला ११.५ षटकात २०१ धावा कराव्या लागतील. पण, मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. इशान किशन ( १४) तिसऱ्या षटकात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर हॅरी ब्रूकच्या हाती झेल देऊन परतला. १२ धावांवर रोहितचा सोपा झेल SRHच्या खेळाडूने टाकला. रोहितचे आज फटके चुकल्या चुकल्यासारखेच वाटत होते आणि तोही त्याने निराश होता. कॅमेरून ग्रीन चांगली फटकेबाजी करताना दिसला आणि मुंबईने पॉवर प्लेमध्ये १ बाद ६० धावा केल्या. ग्रीनची फटकेबाजी पाहून रोहितही जोशात आला आणि त्यानेही खणखणीत षटकार खेचले. ग्रीननेही षटकार खेचून त्याचे अर्धशतक २० चेंडूंत पूर्ण केले.
रोहितनेही ३१ चेंडूंत आयपीएलमधील ४२वे अर्धशतक पूर्ण केले. त्याने या खेळीसह ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ११ हजार धावांचा टप्पाही ओलांडला अन् मुंबई इंडियन्सकडून ५००० धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला. ट्वेंटी-२०त ११ हजार धावा करणारा तो सातवा फलंदाज ठरला. ५१ धावांवर पुन्हा एकदा रोहितचा झेल टाकला आणि याहीवेळी सनवीर सिंगच्या हातून चेंडू निसटला. रोहित व ग्रीनची ६५ चेंडूंतील १२५ धावांची भागीदारी १४व्या षटकात संपुष्टात आली. डागरच्या गोलंदाजीवर नितीश रेड्डीने अफलातून झेल घेतला अन् ३७ धावांत ५६ धावांवर रोहित माघारी परतला. ग्रीनने ४७ चेंडूंत ८ चौकार व ८ षटकारांसह शतक पूर्ण केले. त्याने शतकी धाव घेताना मुंबईला १८ षटकांत विजय मिळवून दिला. ग्रीन व सूर्यकुमार यादव ( २५) यांनी नाबाद ५३ धावांची भागीदारी केली.
आयपीएलमधील अन्य महत्त्वाच्या बातम्या
मुंबई जिंकली अन् बंगळुरूत RCB ची वाट लागतेय! आले महत्त्वाचे अपडेट्स
तत्पूर्वी, SRH ने विवरांत शर्मा व मयांक अग्रवाल ही नवी जोडी सलामीला पाठवली. २३ वर्षीय विवरांतने ४७ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ६९ धावा चोपल्या आणि त्याने मयांकसह पहिल्या विकेटसाठी १३.५ षटकांत १४० धावा जोडल्या. मयांक ४६ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ८३ धावांवर बाद झाला. आकाश मढवालने १९व्या षटकात क्लासेनचा ( १८) व हॅरी ब्रुक ( ०) यांना सलग दोन चेंडूंत दांडा उडवला आणि चार विकेट्स घेतल्या. हैदराबादने ५ बाद २०० धावा केल्या.
Web Title: IPL 2023, MI vs SRH Live Marathi : Play Offs 'Fourth' seat for Mumbai Indians? Rohit Sharma 56 (37), Cameron Green Century (100*); they beat Sunrisers Hyderabad in
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.