IPL 2023, MI vs SRH Live : स्पर्धेबाहेर गेलेल्या SRHला सूर गवसला; मुंबई इंडियन्सला ११.५ षटकांत जिंकायचीय मॅच

IPL 2023, MI vs SRH Live Marathi : स्पर्धेतून आधीच बाहेर गेलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या फॉर्मात नसलेल्या फलंदाजाने आज MIच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 05:18 PM2023-05-21T17:18:39+5:302023-05-21T17:25:42+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, MI vs SRH Live Marathi : Vivrant Sharma 69(47) & Mayank Agarwal 83(46), Akash Madhwal ( 4/37); Sunrisers Hyderabad 200/5 | IPL 2023, MI vs SRH Live : स्पर्धेबाहेर गेलेल्या SRHला सूर गवसला; मुंबई इंडियन्सला ११.५ षटकांत जिंकायचीय मॅच

IPL 2023, MI vs SRH Live : स्पर्धेबाहेर गेलेल्या SRHला सूर गवसला; मुंबई इंडियन्सला ११.५ षटकांत जिंकायचीय मॅच

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Marathi : प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी विजय मिळवणे महत्त्वाचे आहे, हे माहित असतानाही मुंबई इंडियन्सचा खेळ दर्जाहिन झाला. समाचोलक व माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांनीही MIचे कान टोचले. स्पर्धेतून आधीच बाहेर गेलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या फॉर्मात नसलेल्या फलंदाजाने आज MIच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. पहिलाच सामना खेळणाऱ्या २३ वर्षीय फलंदाजासमोर मुंबईचे गोलंदाज हतबल दिसले. आकाश मढवालने ३७ धावांत ४ विकेट्स घेत SRHच्या धावगतीला काहीअंशी वेसण घातले.


SRH ने विवरांत शर्मा व मयांक अग्रवाल ही नवी जोडी सलामीला पाठवली. या जोडीनं सावध खेळ करताना खेळपट्टीवर जम बसवला अन् त्यानंतर मोठे फटके खेचण्यास सुरूवात केली. सूर्यकुमारने चौथ्या षटकात मयांकला रन आऊट करणअयाची सोपी संधी गमावल्याने रोहित शर्मा नाखूश दिसला. जम्मू-काश्मीरमधून आलेल्या २३ वर्षीय विवरांतने ४७ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ६९ धावा चोपल्या. त्याने मयांकसह पहिल्या विकेटसाठी १३.५ षटकांत १४० धावांची यंदाच्या पर्वातील SRHसाठीची सर्वोत्तम भागीदारी केली. मयांकलाही आज चांगला सूर गवसलेला पाहायला मिळाला आणि त्याने मुंबईचा यंदाच्या पर्वातील यशस्वी गोलंदाज पियूष चावला यालाही चोपले. पियूषने ४ षटकांत एकही विकेट न घेता ३९ धावा दिल्या.

आयपीएलमधील अन्य महत्त्वाच्या बातम्या

११ चेंडूंत चोपल्या ४८ धावा! २३ वर्षीय विवरांत शर्माच्या फटकेबाजीने मुंबईला हुडहुडी

ते ७० चेंडू....! मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफ मार्गाचं अवघड गणित, जाणून घ्या RCBसाठीचं समीकरण

गौतम गंभीरसमोर 'कोहली-कोहली'चे नारे; माजी खेळाडूनं हातवारे करत दिली प्रतिक्रिया


१७व्या षटकात आकाश मढवालने शॉर्ट बॉलवर SRHची दुसरी विकेट घेतली. मयांक ४६ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ८३ धावांवर बाद झाला. हेनरिच क्लासेनसह त्याने १७ चेंडूंत ३४ धावांची भागीदारी केली होती. ग्लेन फिलिप्स मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ख्रिस जॉर्डनला विकेट देऊन बाद झाला. या पटापट दोन विकेट्सनंतर SRHच्या धावगतीला रोख लागली आणि मुंबईच्या गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. मढवालने १९व्या षटकात क्लासेनचा ( १८) दांडा उडवला. पुढच्याच चेंडूवर हॅरी ब्रुकचाही ( ०) त्याने अप्रतिम यॉर्कवर दांडा उडवला. हैदराबादने ५ बाद २०० धावा केल्या.  

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूपेक्षा चांगला नेट रन रेट करण्यासाठी मुंबईला ११.५ षटकात २०१ धावा कराव्या लागतील. 

Web Title: IPL 2023, MI vs SRH Live Marathi : Vivrant Sharma 69(47) & Mayank Agarwal 83(46), Akash Madhwal ( 4/37); Sunrisers Hyderabad 200/5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.