MS Dhoni Time Travel: CSKची मॅच पाहायला आला २०४०चा धोनी? Video व्हायरल होताच रंगली जोरदार चर्चा

चेन्नई विरूद्ध पंजाब सामन्या दरम्यान दिसला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 05:46 PM2023-05-10T17:46:18+5:302023-05-10T17:46:45+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 ms dhoni time travel video from 2040 know truth of viral video | MS Dhoni Time Travel: CSKची मॅच पाहायला आला २०४०चा धोनी? Video व्हायरल होताच रंगली जोरदार चर्चा

MS Dhoni Time Travel: CSKची मॅच पाहायला आला २०४०चा धोनी? Video व्हायरल होताच रंगली जोरदार चर्चा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MS Dhoni Time Travel, IPL 2023: इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 16व्या हंगामात आतापर्यंत अनेक रोमांचक क्षण पाहायला मिळाले आहेत. अविश्वसनीय सामना पाहण्यासाठी टीव्हीला चिकटून बसलेल्यांपासून ते स्टेडियममध्ये चेहऱ्यावर विविध भाव दाखवणारे अनेक क्षण दिसले. IPLचे दररोज काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. ते अनेक वेळा आश्चर्यचकित करतात. सध्या एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओच्या आधारावर असा दावा केला जात आहे की 2040 मध्ये धोनी कसा दिसेल तो 'वेळेचा प्रवास' (टाइम ट्रॅव्हल) करून आयपीएल सामने पाहण्यासाठी आला होता.

वास्तविक, एका व्हिडिओने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये 'एमएस धोनी फ्रॉम 2040' दिसत आहे. या क्लिपमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. महेंद्रसिंग धोनी भविष्यातून प्रवास करत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. काही चाहत्यांनी त्याच्या सत्यतेबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. व्हिडिओमध्ये प्रेक्षकांमध्ये बसलेली एक व्यक्ती काहीशी धोनीच्या लूकमध्ये आहे. यामुळे क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. इंस्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला एमएस धोनीसारखा दिसणारा एक वृद्ध दिसत आहे. ही क्लिप चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यातील रेकॉर्ड आहे. कॅमेरा प्रेक्षकांच्या दिशेने जातो तेव्हा एमएस धोनीसारखा दिसणारा माणूस प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतो.

ही पोस्ट आठवड्यापूर्वी शेअर केली होती. पोस्ट केल्यापासून ते सुमारे 10 दशलक्ष वेळा पाहिले गेले. अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले- टाइम ट्रॅव्हल शक्य आहे हे सिद्ध झाले. दुसऱ्याने लिहिले- हे खरे आहे की एखादी कॅमेरा ट्रीक? तिसरा गमतीने म्हणाला की- धोनीने मल्टीवर्समधून प्रवास केला. नेक्स्ट मार्वल मूव्ही:- एमएसडी-मल्टीव्हर्स ऑफ ट्रॉफी.

Web Title: IPL 2023 ms dhoni time travel video from 2040 know truth of viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.