IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२३च्या हंगामाला ३१ मार्चपासून सुरूवात होणार आहे. या वर्षीच्या आवृत्तीत, होम आणि अवे फॉरमॅट ४ वर्षांनंतर परत येत आहे. आयपीएलचा मिनी लिलाव गेल्या वर्षी कोची येथे झाला होता. यादरम्यान अनेक परदेशी आणि भारतीय खेळाडूंना कोट्यवधी रुपये मिळाले. यामध्ये २३ वर्षीय अष्टपैलू खेळाडूचेही नाव होते, ज्याला पाचवेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सने १७.५० कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले होते. कॅमेरून ग्रीन ( Cameroon Green) असे या अष्टपैलू खेळाडूचे नाव आहे. यंदाच्या मोसमात कॅमेरून MI चा कर्णधार रोहित शर्मापेक्षा जास्त कमाई करणार आहे.
IPL २०२३ च्या लिलावाल रेकॉर्ड तोड बोली; इतिहास घडविणाऱ्या टॉप ५ खेळाडूंची यादी
३५ वर्षीय रोहित शर्मा २०११ पासून या फ्रँचायझीचा भाग आहे. मुंबईने त्याला १६ कोटींमध्ये आपलेसे केले. पण त्याच्या पदार्पणाच्या मोसमातच कॅमेरून ग्रीन त्याच्या कर्णधार रोहितपेक्षा जास्त कमाई करेल. सध्या हा खेळाडू भारताविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांचा भाग आहे. ग्रीन हा मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू तर आहेच, पण या लीगच्या इतिहासातील तो दुसरा सर्वात महागडा खेळाडूही आहे.
ग्रीन आणि रोहित व्यतिरिक्त इशान किशन हा मुंबई संघातील तिसरा सर्वात महागडा खेळाडू आहे. इशान किशनला मुंबईने २०२२ च्या लिलावात १५.२५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. गेल्या वर्षी या फलंदाजाने फ्रँचायझीसाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. या फलंदाजाने १४ सामन्यांत ४१८ धावा केल्या. मुंबई संघ हा स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक आयपीएल विजेतेपद पटकावणारा संघ आहे. १५ वर्षात प्रथमच मुंबई इंडियन्सचा संघ गेल्या आवृत्तीत शेवटच्या स्थानावर राहिला आणि १४ सामन्यांत फक्त ४ सामने जिंकता आले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"