IPL 2023 : फक्त तीन खेळाडूंना जास्त भाव... ! ख्रिस गेलने सांगितलं RCBचं एकही IPL ट्रॉफी न जिंकण्यामागचं कारण

IPL 2023 : आयपीएल २०२३ सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. सर्व संघ तयारीत व्यस्त आहेत. प्रत्येक मोसमाप्रमाणे या वेळीही चाहत्यांच्या नजरा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ( RCB) खिळल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 02:07 PM2023-03-20T14:07:00+5:302023-03-20T14:07:28+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 : Only 3 players ɢᴏᴛ ᴀʟʟ ᴛʜᴇ ᴀᴛᴛᴇɴᴛɪᴏɴ.Chris Gayle reveals the reason behind RCB not winning a single IPL trophy | IPL 2023 : फक्त तीन खेळाडूंना जास्त भाव... ! ख्रिस गेलने सांगितलं RCBचं एकही IPL ट्रॉफी न जिंकण्यामागचं कारण

IPL 2023 : फक्त तीन खेळाडूंना जास्त भाव... ! ख्रिस गेलने सांगितलं RCBचं एकही IPL ट्रॉफी न जिंकण्यामागचं कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023 : आयपीएल २०२३ सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. सर्व संघ तयारीत व्यस्त आहेत. प्रत्येक मोसमाप्रमाणे या वेळीही चाहत्यांच्या नजरा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ( RCB) खिळल्या आहेत. अनेक तगडे खेळाडू असूनही या संघाला अद्याप एकही आयपीएल विजेतेपद मिळवता आलेले नाही आणि आता स्फोटक खेळाडू ख्रिस गेलने ( Chris Gayle) माजी संघाच्या अपयशावर मोठा खुलासा केला आहे.
विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल हे त्रिकूट बर्‍याच काळापासून या फ्रँचायझीचा भाग आहेत. कोहली अजूनही या संघाचा एक भाग आहे. असे असतानाही संघाला विजेतेपद पटकावण्यात कधीच यश मिळू शकले नाही. या तीन खेळाडूंची उपस्थिती हेच संघाच्या अपयशाचे कारण गेलने सांगितले आहे. ७ सीझन आरसीबीचा भाग असलेल्या गेलने याबाबत जिओ सिनेमावर चर्चा केली. 

जसप्रीत बुमराह नसल्याची आम्हाला सवय झालीय, आता...! गोलंदाजाच्या भविष्यावर रोहित शर्माचं मोठं विधान


यावेळी तो म्हणाला, ''जेव्हा मी त्या संघात महत्त्वाचा खेळाडू म्हणून खेळलो तेव्हा मी नेहमी माझ्या झोनमध्ये होतो. पण जेव्हा मी आरसीबीच्या दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा मला समजते की संघातील अनेक खेळाडू स्वत:ला फ्रँचायझीचा भाग मानत नाहीत. संघातील अनेक खेळाडूंना असे वाटले की ते या फ्रँचायझीचा अजिबात भाग नाहीत. मी, विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या तीन खेळाडूंकडेच अधिक लक्ष वेधले गेले. यामुळे संघातील अनेक खेळाडू मानसिकदृष्ट्या स्वत:ला संघाचा भाग मानत नव्हते. अशा स्थितीत विजेतेपद मिळवणे नेहमीच आव्हानात्मक असणार आहे.''


गेल २०११ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी संबंधित होता. वेगवान गोलंदाज डर्क नॅन्सचा बदली खेळाडू म्हणून त्याचा संघात समावेश करण्यात आला आणि २०१७ पर्यंत तो या संघाचा भाग राहिला. यादरम्यान त्याने संघासाठी ८५ सामन्यांमध्ये पाच शतकांच्या मदतीने ३१६३ धावा केल्या.  बंगळुरूने २०१६ साली आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती, परंतु अंतिम फेरीत SRHकडून पराभव पत्करावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू रविवारी, २ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध यंदाच्या पर्वातील त्यांच्या मोहिमेची सुरुवात करेल. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023 : Only 3 players ɢᴏᴛ ᴀʟʟ ᴛʜᴇ ᴀᴛᴛᴇɴᴛɪᴏɴ.Chris Gayle reveals the reason behind RCB not winning a single IPL trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.