IPL 2023, Punjab Kings vs Delhi Capitals Live Marathi : २१३ धावा उभारल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने सुरुवात चांगली करताना पंजाब किंग्सच्या सलामीवीरांना लगेच माघारी पाठवले. पण, त्यानंतर त्यांच्या खेळात खूपच ढिसाळपणा पाहायला मिळाला. कुलदीप यादवच्या षटकात लिएम लिव्हिंगस्टोन व अथर्व तायडेचा झेल सोडले. अक्षर पटेलच्या षटकात PBKSच्या फलंदाजांना रन आऊट करण्याचीही संधी गमावली. त्यामुळे कोच रिकी पाँटिंग संतापला.
इशांत शर्माने त्याच्या पहिल्याच षटकात शिखर धवनची विकेट घेतली. खलिल अहमदनेही उत्तम मारा करताना पहिल्या दोन षटकांत २-१-२-० अशी स्पेल टाकली. मागील सामन्यातील शतकवीर प्रभसिमरन सिंगने चौथ्या षटकात इशांतला सलग ती चौकार खेचले अन् पुढे अथर्व तायडेने पाचव्या षटकाची ४, ६ ने सुरुवात केली. ३ षटकांत १ बाद १० नंतर पंजाबने पॉवर प्लेमध्ये १ बाद ४७ धावा केल्या. पण, सातव्या षटकात अक्षर पटेल गोलंदाजीला आला अन् त्याने प्रभसिमरनला फटका मारण्याचे आमीष दिले. त्यावर पंजाबचा फलंदाज फसला आणि २२ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. लिएम लिव्हिंगस्टनचा कुलदीप यादवच्या षटकात एनरिच नॉर्खियाने सोपा झेल टाकला. कुलदीपच्या पुढच्या षटकात अथर्वचा सोपा झेल टाकला. क्षेत्ररक्षकांची खराब कामगिरी पाहून रिकी पाँटिंगही भडकला.
आयपीएलच्या अन्य महत्त्वाच्या बातम्या
नाव मोठे....! कोट्यवधी घेऊन या खेळाडूंनी फ्रँचायझींना लावला चूना!
'उडता' पंजाब! शिखर धवनने अविश्वसनीय झेल घेतला, बाद झालेला वॉर्नरही स्तब्ध झाला
१० षटकांत पंजाबच्या २ बाद ७२ धावा झालेल्या आणि त्यांना अखेरच्या ६० चेंडूंत १३९ धावा करायच्या होत्या. ११व्या षटकात आणखी एक गोंधळ पाहायला मिळाला.. लिव्हिंगस्टोनने मारलेला चेंडू डेव्हिड वॉर्नरच्या हाती गेला. पण, नॉन स्ट्रायकर एंडला अथर्वने क्रिज सोडलेली अन् वॉर्नरचा डायरेक्ट हिट चूकला. त्यानंतर लिव्हिंगस्टोन पळाला, परंतु चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात येण्यापूर्वी त्याने डाईव्ह मारली.
Web Title: IPL 2023, PBKS vs DC Live Marathi : Catch drop & run-out miss of Liam Livingstone, Catch drop & run-out miss of Atharva Taide, Ricky Ponting isn't lost for words
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.