IPL 2023, Punjab Kings vs Delhi Capitals Live Marathi : दिल्ली कॅपिटल्सचेआयपीएल २०२३ मधील आव्हान संपुष्टात आले आहेत आणि त्यामुळे ते आता दडपणाशिवाय खेळताना दिसले. तेच दुसरीकडे पंजाब किंग्सला प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. विजयासह त्यांना नेट रन रेटची उंच ठेवावा लागणार आहे. त्यामुळे PBKS समोर दडपण नक्की असेल. पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पंजाबच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिषी धवन आणि सिकंदर रजा यांच्या जागी अथर्व तायडे व कागिसो रबाडा खेळणार आहेत. दिल्लीच्या ताफ्यात पृथ्वी शॉ याचे कमबॅक झालेय. बऱ्याच दिवसांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये परतलेला पृथ्वी थोडासा दडपणाखाली खेळताना दिसला आणि त्यामुळे तो कोणतीच जोखीम उचलत नव्हता. १० वर्षांनी धर्मशालावर आयपीएल सामना झाला आणि चेंडू चांगलाच उसळी घेताना दिसला. त्यामुळे DCचे सलामीवीर सावधच खेळले, परंतु चौथ्या षटकात डेव्हिड वॉर्नरने हात मोकळे करताना कागिसो रबाडाला चौकार-षटकार मारले. नंतर पृथ्वीनेही ४,४,६ अशी फटकेबाजी करून आत्मविश्वास वाढवला. डेव्हिड वॉर्नरने आयपीएल २०२३ मध्ये ४००+ धावा केल्या आणि आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक ९ वेळा ४००+ धावा करणाऱ्या सुरेश रैना, विराट कोहली व शिखर धवन यांच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली.
आयपीएलच्या अन्य महत्त्वाच्या बातम्या
नाव मोठे....! कोट्यवधी घेऊन या खेळाडूंनी फ्रँचायझींना लावला चूना!
IPL 2023 Play Offs Scenario : मुंबई इंडियन्सचे स्थान डगमगले; MIला बाहेर फेकण्यासाठी दोन संघ सरसावले
वॉर्नर व पृथ्वी यांनी चौथ्या व पाचव्या षटकांत अनुक्रमे १७ व १६ धावा चोपून संघाला पॉवर प्लेमध्ये ६१ धावांचा पल्ला गाठून दिला. १०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर वॉर्नरकडून चूक झाली अन् चेंडू खूप वर उडाला, परंतु राहुल चहरने हा झेल सोडला. पण, ११व्या षटकात शिखर धवनने अविश्वसनीय झेल घेतला... वॉर्नर ३१ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४६ धावांवर सॅम करनच्या गोलंदाजीवर झेल बाद झाला.
Web Title: IPL 2023, PBKS vs DC Live Marathi : Catch of IPL 2023,Running back & flying catch from Shikhar Dhawan sends David Warner back, Delhi capitals 1/94, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.