IPL 2023, Punjab Kings vs Delhi Capitals Live Marathi : दिल्ली कॅपिटल्सचे आयपीएल २०२३ मधील आव्हान संपुष्टात आल्याने त्यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच नव्हतं. तेलही गेले, तूपही गेले हाती राहिले धुपाटणे; अशी अवस्था झालेल्या दिल्लीने आज बिनधास्त खेळ केला. आतापर्यंत आघाडीच्या फळीचे अपयश ही दिल्लीसाठी डोकेदुखी ठरली होती, परंतु आज पंजाब किंग्सच्या गोलंदाजांची याच फळीने धुलाई केली. डेव्हिड वॉर्नर व पृथ्वी शॉ यांच्या फटकेबाजीनंतर रायली रूसोचे वादळ धर्मशालावर घोंगावले. १० वर्षांनी धर्मशालावर होत असलेल्या आयपीएल मॅचमध्ये चाहत्यांना पैसावसून खेळ पाहायला मिळाला.
संघात परतलेल्या पृथ्वी शॉ याने सुरुवातीला सावध पवित्रा घेताना खेळपट्टीवर जम बसवला अन् त्यानंतर डेव्हिड वॉर्नरसह पहिल्या विकेटसाठी ९० धावा चोपल्या. ११व्या षटकात शिखर धवनने अविश्वसनीय झेल घेतला... वॉर्नर ३१ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४६ धावांवर सॅम करनच्या गोलंदाजीवर झेल बाद झाला. त्यानंतर आलेल्या रायली रूसोनेही झटपट धावांचा सपाटा लावला. पृथ्वीनेही ३६ चेंडूंत त्याचे यंदाच्या पर्वातील पहिले व आयपीएलमधील एकूण १३ वे अर्धशतक पूर्ण केले. पृथ्वी व रूसो यांनी २५ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली आणि त्यात रुसोच्या ४२ ( १८ चेंडू) धावा होत्या.
आयपीएलच्या अन्य महत्त्वाच्या बातम्या
नाव मोठे....! कोट्यवधी घेऊन या खेळाडूंनी फ्रँचायझींना लावला चूना!
वडील १० दिवस ICU मध्ये होते, हे मी त्यांच्यासाठी केलं; LSG चा 'मॅच विनर' मोहसिन खान झाला भावुक़
'उडता' पंजाब! शिखर धवनने अविश्वसनीय झेल घेतला, बाद झालेला वॉर्नरही स्तब्ध झाला
१५व्या षटकात सॅम करनने PBKS ची डोकेदुखी वाढवली भागीदारी तोडली. पृथ्वी ३८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकार खेचू ५४ धावांवर सीमारेषेवर झेलबाद झाला. रूसोने २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, परंतु पंजाबचे गोलंदाज पकड बनवताना दिसले. अखेरची दोन षटकं पाहण्यासारखी होती अन् फिल सॉल्टने हात मोकळे करताना खणखणीत षटकार खेचले. १९व्या षटकात त्याने १८ धावा कुटल्या अन् २०व्या षटकात हरप्रीत ब्रारची बेक्कार धुलाई झाली. रूसोने ४,६,१wd,६,१wd,१ अशा धावा चोपल्या. रूसोने ३७ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ८२ धावा केल्या. सॉल्ट नाबाद २६ धावा केल्या आणि दिल्लीने २० षटकांत २ बाद २१३ धावांचा डोंगर उभा केला. रूसो व सॉल्टने ३० चेंडूंत ६५ धावांची भागीदारी केली.