IPL 2023, Punjab Kings vs Delhi Capitals Live Marathi : प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी एकएक मार्ग बंद होत चालला असताना दिल्ली कॅपिटल्सकडून आज चांगल्या खेळीची अपेक्षा होती. डेव्हिड वॉर्नर ( David Warner) याने अर्धशतक झळकावून दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु पंजाब किंग्सच्या फिरकीपटूंनी वाट लावली. हरप्रीत ब्रारने चार विकेट्स घेतल्या, तर राहुल चहरने दोघांना माघारी पाठवले. ० बाद ६९ वरून दिल्लीचा डाव ६ बाद ८८ असा गडगडला. हरप्रीत ब्रारने ४-०-३०-४ असी स्पेल टाकली.
डेव्हिड वॉर्नरने सलग दोन चौकारांनी दिल्लीच्या डावाची सुरुवात केली. फिल सॉल्टनेही तिसऱ्या षटकात हरप्रीत ब्रारला सलग दोन चौकार खेचले अन् संघाला २९ धावांवर पोहोचवले. दिल्लीचे सलामीवीर आक्रमक पवित्रा स्वीकारूनच मैदानावर उतरलेले दिसले अन् ही मॅच लवकर संपवण्याचा त्यांना प्रयत्न दिसला. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये ६५ धावा फलकावर चढवल्या आणि त्यापैकी ४८ धावा ( २१ चेंडू) या वॉर्नरच्याच होत्या. हरप्रीत ब्रारने सातव्या षटकात फिल सॉल्टचा ( २१) त्रिफळा उडवून ६९ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. वॉर्नरने २२ चेंडूंत यंदाच्या आयपीएलमधील पाचवे अर्धशतक झळकावले. राहुल चहरने पुढच्या षटकात मिचेल मार्शला ( ३) पायचीत पकडले. दिल्लीचे विकेटसत्र सुरू राहिले आणि रायली रूसो ( ५) ब्रारच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.
आयपीएलच्या आणखी महत्त्वाच्या बातम्या
यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग भारताच्या वन डे संघात; रोहित, विराट यांना दिली जाणार विश्रांती
कृणाल पांड्याचे २ unplayable चेंडू! हैदराबादच्या फलंदाजांचे उडवले 'दांडू' Video
SRH च्या चाहत्यांनी LSGच्या डग आऊटवर काहीतरी फेकले, कोहलीचे नारे दिले; फुल राडा
बिनबाद ६९ वरून DCची अवस्था ३ बाद ८१ अशी झाली. याचे दडपण वॉर्नरवर जाणवू लागले होते आणि ब्रारने त्याचाच फायदा उचलला अन् राऊंड दी विकेट चेंडू टाकून वॉर्नरला पायचीत केले. वॉर्नर २७ चेंडूंत १० चौकार व १ षटकारांसह ५४ धावांवर बाद झाला. पुढच्या षटकार राहुल चहरने DC ला पाचवा धक्का देताना अक्षर पटेलला ( १) पायचीत केले. हरप्रीतने पुढच्या षटकात इम्पॅक्ट प्लेअर मनीष पांडेचा दांडा उडवून ८८ धावांवर सहावा धक्का दिला.