Join us  

IPL 2023, PBKS vs GT Live : हार्दिक पांड्या हे काय बोलून गेला! MS Dhoni च्या फॅन्सना राग अनावर; म्हणतो, शेवटच्या षटकापर्यंत.... 

IPL 2023, Punjab Kings vs Gujarat Titans Live :  गुजरात टायटन्सची गाडी विजयपथावर आली... पंजाब किंग्सविरुद्ध गुजरातने थरारक विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 7:35 AM

Open in App

IPL 2023, Punjab Kings vs Gujarat Titans Live :  गुजरात टायटन्सची गाडी विजयपथावर आली... पंजाब किंग्सविरुद्ध गुजरातने थरारक विजय मिळवला. शुबमन गिलने ६७ धावांची खेळी करताना विजयात महत्त्वाचा वाटा उचलला, परंतु २०व्या षटकात त्याची विकेट पडली. पण, राहुल चहरने २०व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर चतुराईने चौकार खेचून गुजरातला ६ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. या सामन्यातनंतर GT चा कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याच्या एका विधानाने MS Dhoniचे फॅन्स चिडले आहेत. 

गतविजेत्या GT च्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना PBKSच्या धावगतीवर लगाम लावली. कर्णधार शिखर धवन आज अपयशी ठरल्याने पंजाबची हाराकिरी झाली. पंजाबच्या फलंदाजांना बॅट अन् बॉल यांच्यातला समन्वय राखण्यात अपयश आलेले पाहायला मिळाले. मोहित शर्माने प्रभावी मारा करताना ४-०-१८-२ अशी स्पेल टाकली.  शिखर धवन ( ८) आज काही कमाल करू शकला नाही. मॅथ्यू शॉर्टने २४ चेंडूंत ३६ धावा करून पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.  भानुका राजपक्षा ( २०) आणि जितेश शर्मा ( २५) यांनीही चांगली फलंदाजी केली. सॅम करन ( २२) व शाहरुख खानने ९ चेंडूंत २२ धावा करून पंजाब किंग्सला ८ बाद  १५३ धावांपर्यंत पोहोचवले. 

वृद्धीमान साहा व शुबमन गिल यांनी गुजरातला दमदार सुरूवात करून देताना पहिल्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. कागिसो रबाडाने ही जोडी तोडून आयपीएलमध्ये १०० विकेट्सचा टप्पा गाठला. साहा १९ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ३० धावांवर शॉर्टकरवी झेलबाद झाला. त्याने अवघ्या ६४ सामन्यांत हा पराक्रम करून आयपीएलमध्ये सर्वात जलद १०० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. त्याने लसिथ मलिंगा ( ७०), हर्षल पटेल ( ७९) व भुवनेश्वर कुमार ( ८१) यांचा विक्रम मोडला. साई सुदर्शन ( १९) याने शुबमनसह GTच्या धावा वाढवल्या, परंतु अर्शदीप सिंगने त्याची विकेट घेतली. हार्दिक ( ८) धावांवर बाद झाला. शुबमनने ४९ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ६७ धावा केल्या. राहुल तेवातियाने २ चेंडूंत नाबाद ५ धावा करून विजय पक्का केला. 

हार्दिक पांड्या म्हणाला, ''खरं सांगायचं झालं तर मला शेवटच्या षटकापर्यंत मॅच घेऊन जाणे आवडत नाही. जितक्या लवकर ती संपवता येईल असा माझा प्रयत्न असतो. ( हार्दिकच्या याच विधानावरून धोनीचे फॅन्स चिडलेत) आज अखेरच्या षटकापर्यंत मॅच गेली आणि नशिबाने आम्ही ती जिंकली. आम्हाला धोका पत्करायला हवा आणि मधल्या षटकांत फटकेबाजी करायला हवी. जेणेकरून अखेरच्या षटकापर्यंत सामना जाणार नाही. मोहित आणि अल्झारी यांच्या गोलंदाजीने मी प्रभावीत झालो. मोहितने खूप मेहनत घेतली आहे आणि त्याने प्रचंड संयमही दाखवला आहे.''

 

टॅग्स :आयपीएल २०२३हार्दिक पांड्यामहेंद्रसिंग धोनीगुजरात टायटन्सपंजाब किंग्स
Open in App