IPL 2023, Punjab Kings vs Gujarat Titans Live : विजयपथावर परतण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातल्या सामन्यात यजमान बॅकफूटवर फेकले गेले. गतविजेत्या GT च्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना PBKSच्या धावगतीवर लगाम लावली. कर्णधार शिखर धवन आज अपयशी ठरल्याने पंजाबची हाराकिरी झाली. पंजाबच्या फलंदाजांना बॅट अन् बॉल यांच्यातला समन्वय राखण्यात अपयश आलेले पाहायला मिळाले. मोहित शर्माने प्रभावी मारा करताना ४-०-१८-२ अशी स्पेल टाकली. मोहित आधी चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता. MS Dhoniचा त्याच्यावर फार विश्वास होता. २०२० नंतर तो प्रथमच आयपीएल सामना खेळतोय.
अम्पायरने केली चिटींग? गुजरात टायटन्ससाठी नियमाची मोडतोड; पंजाब किंग्सला फटका
गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पंजाबचा सलामीवीर प्रभसिमरन सिंगला दुसऱ्याच चेंडूवर मोहम्मद शमीने बाद केले. शिखर धवन ( ८) आज काही कमाल करू शकला नाही आणि जोशुआ लिटलने त्याला माघारी पाठवले. मॅथ्यू शॉर्ट मात्र जबरदस्त फटकेबाजी करताना दिसला. सातव्या षटकात राशीद खान गोलंदाजीला आला अन् त्याने गुजरातला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. २४ चेंडूंत ३६ धावा करणारा शॉर्ट गुगलीवर त्रिफळाचीत झाला.
राजपक्षा आणि जितेश शर्मा यांनी पंजाबचा डाव सावरला होता. पण, गुजरातकडून पदार्पण करणाऱ्या मोहितने ही जोडी तोडली. जितेश शर्मा २३ चेंडूंत २५ धावांवर बाद झाला. यष्टिरक्षक वृद्धीमान साहाने अचूक DRS घेतल्याने गुजरातला ही विकेट मिळाली. सॅम करन आणि राजपक्षा यांनी पंजाबची खिंड लढवली. मधल्या षटकांत पंजाबच्या फलंदाजांनी धावांचा प्रयत्नच न केल्याने गुजरातला सामन्यावर पुनरागमन करण्याची संधी मिळाली. अल्झारी जोसेफने महत्त्वाची विकेट घेताना राजपक्षाला ( २०) झेलबाद केले. राशीदने २६ धावांत १ आणि जोसेफने ३६ धावांत १ विकेट घेतली. मोहितने डावातील दुसरी विकेट घेताना सॅम करनला ( २२) स्लो बाऊन्सरवर बाद केले. शाहरुख खान ९ चेंडूंत २२ धावा करून रन आऊट झाला. पंजाब किंग्सने ८ बाद १५३ धावा केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"