IPL 2023, Punjab Kings vs Gujarat Titans Live : पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स हे इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये पुन्हा विजयपथावर परतण्यासाठी प्रतय्नशील आहे. दोन्ही संघांनी तीनपैकी २ सामने जिंकले आहेत, परंतु दोघांना मागील लढतीत पराभव पत्करावा लागला आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात अम्पायरने नियमाची मोडतोड करून गुजरात टायटन्सला मदत केल्याची पंजाब किंग्सच्या चाहत्यांमध्ये भावना निर्माण झाली आहे.
PBKSला सपोर्ट करतेय 'स्वप्न सुंदरी'! प्रीतिवर पडतेय भारी 'परदेशी' नारी
हार्दिक मागच्या सामन्यात खेळला नव्हता, परंतु तो आज पुनरागमन करतोय. मोहित शर्मा गुजरातकडून पदार्पण करत आहे. पंजाबचा सलामीवीर प्रभसिमरन सिंगला दुसऱ्याच चेंडूवर मोहम्मद शमीने बाद केले. शिखर धवन ( ८) आज काही कमाल करू शकला नाही आणि जोशुआ लिटलने त्याला माघारी पाठवले. पंजाबने ६ षटकांत २ बाद ५२ धावा केल्या. मॅथ्यू शॉर्ट मात्र जबरदस्त फटकेबाजी करताना दिसला. भानुका राजपक्षाने दुखापतीतून सावरून आज पुनरागमन केलं.
सातव्या षटकात राशीद खान गोलंदाजीला आला अन् त्याने गुजरातला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. २४ चेंडूंत ३६ धावा करणारा शॉर्ट गुगलीवर त्रिफळाचीत झाला. राजपक्षा आणि जितेश शर्मा यांनी पंजाबचा डाव सावरला होता. पण, गुजरातकडून पदार्पण करणाऱ्या मोहितने ही जोडी तोडली. जितेश शर्मा २३ चेंडूंत २५ धावांवर बाद झाला. मात्र, ही विकेट वादात अडकण्याची शक्यता आहे. मोहितने टाकलेला चेंडू जितेशच्या बॅटच्या बाजूनं यष्टिरक्षक वृद्धीमान साहाच्या हाती विसावला. त्यावर साहाने अपील केले आणि काहीतरी ऐकले असे त्याने हार्दिकला सांगितले. मोहितला मात्र आवाज ऐकू आला नव्हता.
हार्दिक सातत्याने DRS घेऊ की नको असे साहाला विचारत होता आणि त्यासाठीचे १५ सेकंदाच्या वेळेची उलटी मोजणी सुरू झाली होती. घड्याळ्यात ० असे आल्यानंतर हार्दिकने DRSची मागणी केली. आपण उशीर केला याची जाणीव हार्दिकला झाली होती आणि त्याने डोक्यावर हात मारला. पण, अम्पायरने नियम मोडून GT ला DRS दिला अन् त्यावर PBKSची विकेट पडली. वेळ संपल्यानंतरही हार्दिकला DRS दिल्याने वाद होऊ शकतो.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"