Join us  

IPL 2023 PBKS vs LSG, Live: लखनौला पहिला झटका; केएल राहुल स्वस्तात आउट; रबाडाच्या चेंडूवर शाहरुख हाती झेलबाद

Punjab Kings vs Lucknow Super Giants: आयपीएलचा आज 38 वा सामना पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पंजाबच्या मोहालीमध्ये होते आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 7:58 PM

Open in App

PBKS vs LSG, IPL 2023 Live: आयपीएलमध्ये आज 38 वा सामना पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पंजाबच्या मोहालीमध्ये होते आहे. पंजाबने टॉस जिंकून गोलंदीजाचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना लखनौची चांगली सुरुवात झाली आहे. कर्णधार केएल राहुल आणि कायल मायर्स यांनी लखनौला चांगली सुरुवात करुन दिली.

या सामन्यात पंजाबकडून गुरनूर ब्रारने डेब्यू केले आहे. त्याने सामन्याची पहिली ओव्हर टाकली. पहिल्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर केएल राहुलला जीवदान मिळाले. राहुलची कॅच उडाली पण, पंजाबच्या खेळाडूला ती कॅच करता आली नाही. केएल राहुलला जीवदान मिळाल्यामुळे पंजाबला मोठे नुकसान होईल असे वाटत होते, पण चौथ्या ओव्हरला राहुल बाद झाला.

सामन्याची चौथी ओव्हर कसिगो रबाडाने टाकली. रबाडाच्या पहिल्याच्या चेंडूवर राहुलने शानदार चौकार मारला, पण दुसऱ्या चेंडूवर तो झेलबाद झाला. त्याने स्लिपमध्ये थांबलेल्या शाहरुख खानच्या हाती अलगद तेंडू सरकावला. राहुलनंतर बदोनी आणि मायर्स संघाला पुढे नेत आहेत. 

पंजाब किंग्स: शिखर धवन (कर्णधार), अर्थव ताइडे, सिकंदर रजा, लियम लिविंगस्टन, सैम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, कगिसो रबाडा, राहुल चाहर, गुरनूर बराड़, अर्शदीप सिंह.

लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार),काइल मायर्स, निकोलस पूरन, दीपक हुड्डा, मार्कस स्टोइनिस, क्रुणाल पंड्या, आयुष बढोनी, नवीन उल हक, रवि बिश्नोई, आवेश खान, यश ठाकुर.

टॅग्स :आयपीएल २०२३लखनौ सुपर जायंट्सपंजाब किंग्स
Open in App