Join us  

IPL 2023, PBKS vs LSG Live : शाहरुख खानचे 'तळ्यात, मळ्यात' झेल; कृणाल पांड्या संतापला, बॅट आपटत तंबूत गेला, Video

IPL 2023, Punjab Kings vs Lucknow Super Giants Live : शिखर धवनच्या अनुपस्थितीत मैदानावर उतरलेल्या पंजाब किंग्सने आजच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 10:03 PM

Open in App

IPL 2023, Punjab Kings vs Lucknow Super Giants Live : शिखर धवनच्या अनुपस्थितीत मैदानावर उतरलेल्या पंजाब किंग्सने आजच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याने आयपीएलमध्ये सर्वात वेगवान ४०००+धावा करण्याचा विक्रम नोंदवला. या सामन्यात पंजाबच्या शाहरुख खानने दोन सुरेख झेल टिपले. 

केएलने ५६ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारांसह ७४ धावांची खेळी केली.  PBKSचा कर्णधार सॅम करनने ३ आणि कागिसो रबाडाने २ विकेट्स घेतल्या. राहुल व कायले मायर्स यांनी ७.४ षटकांत ५३ धावा फलकावर चढवल्या. हरप्रीत ब्रारने PBKSला पहिले यश मिळवून देताना मायर्सची ( २९) विकेट घेतली. दीपक हुडा ( २) पुन्हा अपयशी ठरला. लोकेश आणि कृणाल पांड्या यांनी ४८ धावांची भागीदारी करताना लखनौचा डाव सावरला. कृणाल आज चांगल्या टचमध्ये दिसत होता, परंतु कागिसो रबाडाच्या चेंडूवर मारलेला फटका शाहरुख खानने सीमारेषेवर चतुराईने टिपला. कृणाल १८ धावांवर झेलबाद झाला. 

त्याच षटकात रबाडाने LSGच्या निकोलस पूरनला ( ०) माघारी पाठवले. मार्कस स्टॉयनिस १५ धावांवर माघारी परतला अन्  लखनौला ६ बाद १५९ धावा करता आल्या. शाहरूख खानने आजच्या सामन्यात चार झेल घेतले आणि त्यापैकी दोन झेल हे सहज षटकार जाणारे चेंडू होते. त्याने चतुराईने पहिला चेंडू अडवला अन् नंतर तोल जातोय हे दिसताच चेंडू पुन्हा हवेत भिरकावून सीमारेषेबाहेर जाऊन पुन्हा आत येत तो टिपला. 

टॅग्स :आयपीएल २०२३पंजाब किंग्सलखनौ सुपर जायंट्सक्रुणाल पांड्या
Open in App