IPL 2023, Punjab Kings vs Lucknow Super Giants Live : पंजाब किंग्सने आजच्या सामन्यात भारतीय क्रिकेटपटू हरप्रीत सिंग भाटीया ( Harpreet Singh Bhatia) याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. ३१ वर्षीय हरप्रीत भाटीयाचे नाव प्लेइंग इलेव्हनमध्ये आले अन् त्याच्या नावावर मोठा विक्रम नोंदवला गेला. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात पंजाबच्या बुडत्या नावेला आतापर्यंत हरप्रीत भाटीयाने सावरले आहे. आयपीएल २०१२ मध्ये भाटीया शेवटचा खेळला होता आणि त्यानंतर तो थेट २०२३ मध्ये आयपीएल खेळतोय. आयपीएलच्या दोन सामन्यांमध्ये सर्वाधिक कालावधी भाटीयाच्या नावावर नोंदवला गेला. पंजाबने LSG विरुद्धचा सामना २ विकेट्स राखून जिंकला.
जो जिता वही सिकंदर! पंजाब किंग्ससाठी शाहरुख ठरला फिनिशर, KL Rahulला नडला अतिआत्मविश्वास
२०१०च्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचा सदस्य असलेल्या हरप्रीत भाटीयाला २०१०मध्ये दोनवेळच्या विजेत्या कोलकाता नाइट रायडर्सने आपल्या ताफ्यात गेतले. त्यानंतर २०११मध्ये तो पुणे वॉरियर्स संघाकडे गेला. २०१७मध्ये त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सर्फराज खानच्या दुखापतीनंतर करारबद्ध केले, परंतु त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. ३१ वर्षीय खेळाडूला आयपीएलमध्ये त्याचं कौशल्य दाखवण्याची पुरेशी संधी मिळाली नाही. लखनौविरुद्ध त्याने पंजाबचा डाव सावरताना २२ धावांची उपयुक्त खेळी केली.
आज त्याने ३९८१ दिवसानंतर आयपीएलमधील दुसरी मॅच खेळली आणि दोन सामन्यांमधील हा सर्वाधिक कालावधी ठरला. यापूर्वी मॅथ्यू वेडने ३९६२ दिवसानंतर पुढील सामना खेळला होता. दक्षिण आफ्रिकेचा वेन पार्नेल यानेही ३२४२ दिवसानंतर पुढील मॅच खेळली. आयपीएल २०२३ मध्ये त्याने RCBकडून लखनौविरुद्धच हा सामना खेळला होता. त्याचाच सहकारी रिली रोसोवू २८९९ दिवसानंतर आणि कॉलिन इग्राम २८६२ दिवसानंतर पुढील सामना खेळला होता. भारतीयांमध्ये यष्टिरक्षक-फलंदाज श्रीवस्त गोस्वामीच्या दोन सामन्यांमधील कालावधी हा २१८१ दिवसांचा होता.
Web Title: IPL 2023, PBKS vs LSG Live : Harpreet Singh Bhatia breaks record for longest gap between two IPL matches, His first appearance in the tournament after a hiatus of 3981 days
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.