IPL 2023, Punjab Kings vs Lucknow Super Giants Live : शिखर धवनच्या अनुपस्थितीत मैदानावर उतरलेल्या पंजाब किंग्सने आजच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याने मोठ्या विक्रमाची नोंद करताना ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली या स्टार्सना मागे टाकले. केएलने ५६ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारांसह ७४ धावांची खेळी केली. PBKSचा कर्णधार सॅम करनने ३१ धावांत ३ विकेट्स घेतल्या, तर कागिसो रबाडाने ३४ धावांत २ विकेट्स घेतल्या.
मुंबई इंडियन्सचे खेळाडू महिला संघाची जर्सी घालून मैदानावर उतरणार, मुलींना प्रेरणा देण्यासाठी पुढाकार
शिखर धवनला दुखापतीमुळे आजच्या सामन्याला मुकावे लागल्याने सॅम करन पंजाब किंग्सचे नेतृत्व करण्यासाठी मैदानावर उतरला. त्याने नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार लोकेश राहुल व कायले मायर्स यांनी आक्रमक सुरूवात करताना ७.४ षटकांत ५३ धावा फलकावर चढवल्या. हरप्रीत ब्रारने PBKSला पहिले यश मिळवून देताना मायर्सची ( २९) विकेट घेतली. दीपक हुडा ( २) पुन्हा अपयशी ठरला, सिकंदर रझाने त्याला पायचीत केले. लोकेशने या सामन्यात आयपीएलमधील ४००० धावांचा टप्पा ओलांडला. त्याने सर्वात कमी १०५ इनिंग्जमध्ये या धावा करताना ख्रिस गेलचा ( ११२ इनिंग्ज) विक्रम मोडला. डेव्हिड वॉर्नर ( ११४), विराट कोहली ( १२८) आणि एबी डिव्हिलियर्स ( १३१) यांचा क्रमांक नंतर येतो.
लोकेशेने ४० चेंडूंत यंदाच्या आयपीएलमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले आणि कर्णधार म्हणून २००० धावाही त्याने पूर्ण केल्या. लोकेश आणि कृणाल पांड्या यांनी ४८ धावांची भागीदारी करताना लखनौचा डाव सावरला. कृणाल आज चांगल्या टचमध्ये दिसत होता, परंतु कागिसो रबाडाच्या चेंडूवर मारलेला फटका शाहरुख खानने सीमारेषेवर चतुराईने टिपला. कृणाल १८ धावांवर झेलबाद झाला. त्याच षटकात रबाडाने LSGच्या निकोलस पूरनला ( ०) माघारी पाठवून PBKSला मोठं यश मिळवून दिलं. ( पाहा शाहरुखने घेतलेला कृणाल पांड्याचा अफलातून झेल ) मार्कस स्टॉयनिसने काही खडेखडे सिक्स मारले, परंतु सॅम करनच्या चतुर DRS ने त्याला १५ धावांवर माघारी जायला लावले. लखनौला ८ बाद १५९ धावा करता आल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"