PBKS vs LSG, IPL 2023 Live: आयपीएलचा आज 38 वा सामना पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पंजाबच्या मोहालीमध्ये होते आहे. या मोसमात दुसऱ्यांदा हे दोन्ही संघ आमनेसामने येत आहेत. अखेरच्या सामन्यात शिखर धवनच्या पंजाबने केएल राहुलच्या लखनौला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभवाची धूळ चारली होती.
आता या दोन्ही संघातील दुसरा सामना पंजाबच्या मोहाली येथे होत आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सकडे हा सामना जिंकून पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली आहे. संघ दोन बदलांसह मैदानात उतरला आहे. शॉर्टच्या जागी सिकंदर रझा परतला आहे. तसेच, वेगवान गोलंदाज मार्क वुडच्या अनुपस्थितीत लखनौचे गोलंदाजी आक्रमण कमकुवत झाले आहे. वुडने 15 एप्रिलपासून एकही सामना खेळलेला नाही आणि संघाला त्याच्याकडून लवकर पुनरागमनाची अपेक्षा आहे.
पंजाब किंग्स:शिखर धवन (कर्णधार), अर्थव ताइडे, सिकंदर रजा, लियम लिविंगस्टन, सैम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, कगिसो रबाडा, राहुल चाहर, गुरनूर बराड़, अर्शदीप सिंह.
- लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार),काइल मायर्स, निकोलस पूरन, दीपक हुड्डा, मार्कस स्टोइनिस, क्रुणाल पंड्या, आयुष बढोनी, नवीन उल हक, रवि बिश्नोई, आवेश खान, यश ठाकुर.
दोन्ही संघांची कामगिरी
पंजाब किंग्जने या मोसमात आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. ज्यात चार जिंकले आणि तीन सामन्यात पराभव झाला आहे. संघाकडे सध्या आठ गुण आहेत. तर, लखनौ सुपर जायंट्सने या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये 4 विजय आणि 3 पराभव पत्करले आहेत. संघाकडे आठ गुण आहेत.
Web Title: IPL 2023 PBKS vs LSG, Live: Punjab kings won toss and elect to bowl; A chance for Lucknow to atone for the defeat
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.