IPL 2023, PBKS vs LSG Live : जो जिता वही सिकंदर! पंजाब किंग्ससाठी शाहरुख ठरला फिनिशर, KL Rahulला नडला अतिआत्मविश्वास  

IPL 2023, Punjab Kings vs Lucknow Super Giants Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आणखी एक रोमहर्षक सामना झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 11:32 PM2023-04-15T23:32:12+5:302023-04-15T23:33:15+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, PBKS vs LSG Live : Shahrukh Khan finishes off in style! Punjab Kings win by two wicket | IPL 2023, PBKS vs LSG Live : जो जिता वही सिकंदर! पंजाब किंग्ससाठी शाहरुख ठरला फिनिशर, KL Rahulला नडला अतिआत्मविश्वास  

IPL 2023, PBKS vs LSG Live : जो जिता वही सिकंदर! पंजाब किंग्ससाठी शाहरुख ठरला फिनिशर, KL Rahulला नडला अतिआत्मविश्वास  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Punjab Kings vs Lucknow Super Giants Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आणखी एक रोमहर्षक सामना झाला. लखनौ सुपर जायंट्सच्या १६० धावांच्या लक्ष्याचा पंजाब किंग्स सहज पाठलाग करतील असे वाटले होते. पण, शिखर धवनची उणीव पंजाबला जाणवली. LSGच्या नव्या गोलंदाजानं सुरूवातीलाच PBKSला धक्के दिले. सिकंदर रझाने ५७ धावांची खेळी करून खिंड लढवली होती अन् शाहरुख खानवर सामना संपवण्याची जबाबदारी होती आणि त्याने ती चोख पार पाडली. 

पंजाब किंग्सची सुरुवात काही खास झाली नाही. LSG कडून पदार्पण करणाऱ्या युधवीर सिंगने तिसऱ्याच चेंडूवर PBKSचा सलामीवीर अथर्व तायडे (०) याला माघारी पाठवले. त्यानंतर पुढच्या षटकात प्रभसिमरन सिंगाच त्रिफळा उडवला. युधवीरने टाकलेल्या चेंडूचा वेग इतका होता की यष्टिंनी दोन-तीन वेळा टप्पा खाल्ला. LSGसाठी डोकेदुखी ठरलेल्या मॅथ्यू शॉर्टला ( ३४) के गौथमने चूक करण्यास भाग पाडले अन् मार्कस स्टॉयनिसने सोपा झेल घेतला. ३९८१ दिवसानंतर आयपीएलमधील दुसरा सामना खेळणाऱ्या हरप्रीत सिंग भाटीया आणि सिकंदर रझा यांनी पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांची ३० धावांची भागीदारी कृणाल पांड्याने तोडली. भाटीया २२ धावांवर झेलबाद झाला. 

सिंकदर चांगली फटकेबाजी करत होता, परंतु त्याला साथ मिळत नव्हती. कर्णधार सॅम करन ६ धावांवर झेलबाद झाला, रवी बिश्नोईने ही विकेट मिळवली. ३० चेंडूंत ४५ धावा पंजाबला करायच्या होत्या आणि सिंकदर असल्याने त्या सहज शक्यही वाटत होत्या. सिकंदरने ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. १६व्या षटकात लोकेशने अफलातून झेल घेताना जितेश शर्माला ( २) माघारी पाठवले. २५ चेंडूंत ३८ धावांची गरज असताना शाहरूख खानने त्याचा पहिलाच चेंडू सीमापार पाठवला. १४ चेंडूंत २१ धावा हव्या असताना बिश्नोईने पंजाबला मोठा धक्का दिला. ४१ चेंडूंत ५७ धावा करणारा सिकंदर बाद झाला.

शाहरूख व हरप्रीत ब्रार यांनी १९व्या षटकात मार्क वूडला चोपले.  शेवटच्य़ा षटकात ७ धावा हव्या होत्या आणि बिश्नोईला षटक देऊन राहुलने मोठा डाव खेळला. शाहरूखने १९ धावांची नाबाद खेळी करून पंजाबला २ विकेट्स राखून विजय पक्का केला. 


तत्पूर्वी, शिखर धवनच्या अनुपस्थितीत मैदानावर उतरलेल्या पंजाब किंग्सने आजच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याने ५६ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारांसह ७४ धावांची खेळी केली.  PBKSचा कर्णधार सॅम करनने ३ आणि कागिसो रबाडाने २ विकेट्स घेतल्या. राहुल व कायले मायर्स ( २९) यांनी ७.४ षटकांत ५३ धावा फलकावर चढवल्या. लोकेश आणि कृणाल पांड्या यांनी ४८ धावांची भागीदारी करताना लखनौचा डाव सावरला. कागिसो रबाडाने एकाच षटकात कृणाल आणि निकोलस पूरन यांना बाद केले.  मार्कस स्टॉयनिस १५ धावांवर माघारी परतला अन्  लखनौला ६ बाद १५९ धावा करता आल्या.  
 

Web Title: IPL 2023, PBKS vs LSG Live : Shahrukh Khan finishes off in style! Punjab Kings win by two wicket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.