पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या खेळपट्टीवर राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्सचा संघ विजयी लय कायम राखण्यासाठी आज मैदानात उतरतील. मात्र या सामन्यात राजस्थान रॉयल्सचे पारडे काहीसे जड समजले जाते आहे. बारसपारा स्टेडियम हे दोन्ही संघांचे होमग्राउंड नाही. त्यामुळे खेळपट्टीची अजिबात जाण नसताना अंतिम एकादश निश्चित करण्याचे आव्हान दोन्ही संघांसमोर असेल.
दोन्ही संघांना प्रत्येकी एक सामना जिंकण्यात यश आले आहे. आता दोन्ही संघ आजचा सामना जिंकून गुणतालिकेत आपले स्थान सुधारण्याचा प्रयत्न करतील. पंजाब किंग्जने त्यांच्या पहिल्या सामन्यात केकेआरचा पराभव केला, तर राजस्थानला हैदराबादचा पराभव करण्यात यश मिळाले. पंजाब किंग्जचा संघ एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकू शकलेला नाही, तर दुसरीकडे राजस्थान आयपीएलचा पहिला हंगाम जिंकण्यात यशस्वी ठरला होता. मात्र त्यानंतर राजस्थानचा संघ विजेतेपद मिळवू शकला नाही. संजू सॅमसन राजस्थानचा कर्णधार आहे तर शिखर धवन पंजाब किंग्जचा कर्णधार आहे.
या खेळाडूंवर असेल नजर
१)जोस बटलर : टी-२० प्रकारात जगातील अव्वल फलंदाजांमध्ये गणना
२) ट्रेन्ट बोल्ट: क्रिकेट जगतातील सर्वात धोकादायक डावखुरा गोलंदाज म्हणून ओळख
३) युझवेंद्र चहल : फिरकीच्या तालावर भल्याभल्यांना नाचवण्याची क्षमता
१)शिखर धवन: आक्रमक सुरुवातीची अपेक्षा
२) अर्शदीप सिंग : पहिल्या सामन्यातील चमकदार कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रयत्नशील
३) भानुका राजपक्षे: मधल्या फळीतील आक्रमक खेळाडू
पंजाब किंग्ज संभाव्य प्लेइंग XI
शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, शाहरुख खान, सॅम कुरान, सिकंदर रझा, नॅथन एलिस, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, अर्शदीप सिंग
राजस्थानसाठी नवदीप सैनी किंवा संदीप शर्मा 'इम्पॅक्ट प्लेअर'ची भूमिका बजावू शकतात.
राजस्थान रॉयल्स संभाव्य प्लेइंग XI
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युझवेंद्र चहल
कागिसो रबाडा पंजाब किंग्जसाठी 'इम्पॅक्ट प्लेअर'ची भूमिका बजावू शकतो.
Web Title: IPL 2023 PBKS vs RR: Rajasthan Royals Vs Punjab Kings Match Today; Who will be the impact player, see the probable playing XI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.