IPL 2023 च्या हंगामातील सध्या सुरूवातीचा टप्पा सुरू आहे. पहिल्या आठवड्यात अनेक खेळाडू आणि संघमालक सामन्यांसाठी हजर राहिले नव्हते. पण आता हळूहळू आपापल्या आंतरराष्ट्रीय संघाचे सामने संपवून विविध फ्रँचायजीचे बडे खेळाडू संघात दाखल होत आहेत. जसजशी स्पर्धा पुढे सरकत आहे, तस तसे काही असे खेळाडूही स्पर्धेत दिसू लागले आहेत. बरेच खेळाडू हे दुखापतीमुळेही संघाबाहेर होते. त्यापैकी एक खेळाडू आता पंजाब किंग्जकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, तब्बल १२९ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर तो मैदानात उतरणार आहे. त्यामुळे पंजाबच्या मालकीणबाई बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाच्या गालावरची खळीही खुलणार आहे.
-----------
पंजाब किंग्जसाठी एक तगडा फलंदाज आजच्या सामन्यातून दमदार कमबॅक करण्यास सज्ज झाला आहे. त्याचे नाव म्हणजे लियम लिव्हिंगस्टोन. तो गेल्या वर्षी तुफान फॉर्मात होता. पण दुखापतीने त्याला संघाबाहेर बसवले गेले. आता यावर्षी तो १२९ दिवसांनंतर खेळायला उतरणार आहे. पंजाब किंग्जचा पुढील सामना गुजरात टायटन्सशी आहे. हा सामना मोहालीत होणार आहे. यात लियम लिव्हिंगस्टोन खेळताना दिसण्याची शक्यता आहे. कारण सामन्यापूर्वीच्या प्रॅक्टिस व्हिज्युअलमध्ये तो नेटवर बॅटींग करताना दिसला आहे. लिव्हिंगस्टन जर गुजरात टायटन्सविरुद्ध खेळला तर आयपीएल 2023 मधील हा त्याचा पहिला सामना असेल. यासह तो १२९ दिवसांनी क्रिकेटच्या मैदानावर बॅटिंग करताना दिसणार आहे. पायाच्या दुखापतीमुळे तो मैदानाबाहेर होता.
कधी झाली दुखापत?
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पाकिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यादरम्यान लिव्हिंगस्टनच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. ही टेस्ट 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान खेळली गेली. त्यानंतर तो खेळलेला नाही. पण, आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. आणि, त्याच्या आयपीएल संघासाठी कामगिरी करण्यास उत्सुक आहे.
कुणाच्या जागी खेळणार?
आता लियाम लिव्हिंग्स्टनला पंजाब किंग्जमध्ये स्थान मिळेल का, हा प्रश्न आहे. तर उत्तर मॅट शॉर्ट असू शकते. मात्र, त्याचे खेळणे किंवा न खेळणे यावर अंतिम निर्णय व्यवस्थापनाला घ्यावा लागेल. मात्र, त्याच्या वतीने तो मोहालीत खेळण्यास सज्ज आहे.