मुंबई इंडियन्स १४ गुणांसह प्ले ऑफच्या शर्यतीत आहेत आणि त्यांचे नशीब आता त्यांच्याच हातात आहे. आज लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ( MI vs LSG) ते मैदानावर उतरणार आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये फिरकीपटू पियूष चावला ( Piyush Chawla) याने उल्लेखनीय कामगिरी करताना चर्चेत आला... मागच्या पर्वात त्याच्यावर कुणी बोलीच लावली नव्हती अन् यंदा त्याने कमबॅक केले. “गोष्टी आमच्या नियंत्रणात आहेत. आम्ही आमचे उरलेले दोन सामने जिंकले तर आम्ही पहिले किंवा दुसरे स्थान मिळवू शकू. आम्हाला फक्त चांगले क्रिकेट खेळायचे आहे. संघाने योग्य वेळी वेग पकडला. आत्मविश्वास खूप चांगला आहे पण आत्मविश्वास आणि अतिआत्मविश्वास यांच्यात खूप पातळ रेषा आहे आणि ती रेषा आम्ही ओलांडू इच्छित नाही,” चावला म्हणाला.
पियूष चावला गेल्या वर्षी पहिल्यांदा आयपीएल खेळू शकला नाही. त्यामुळे त्याला त्याच्या भविष्याबद्दल विचार करण्यास प्रवृत्त केले, परंतु त्याला आपल्या मुलासाठी स्पर्धेत परतायचे होते. “गेल्या वर्षी जेव्हा माझी निवड झाली नाही आणि समालोचन करत होतो तेव्हा माझ्या मनात अनेक गोष्टी चालू होत्या. मी परत यावे की इतर गोष्टी एक्सप्लोर कराव्यात हे ठरवू शकलो नाही. माझा मुलगा मोठा होत आहे आणि तो खूप आयपीएल पाहत होता आणि त्याबद्दल खूप उत्सुक होता. त्यामुळे माझ्या कुटुंबाने मला फक्त त्याच्यासाठी खेळायला सांगितले. त्यामुळे मी त्याच्यासाठी खेळत आहे आणि त्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करत आहे.”
अनुभवी फिरकीपटू म्हणाला,“जेव्हा तुम्ही २० वर्षे खेळत असाल तेव्हा तुम्हाला विशेष काही करण्याची गरज नाही. मी जिथे जमेल तिथे ट्वेंटी-२० सामने खेळत होतो. मी नेटमध्ये गोलंदाजी केली. मला सामन्यात गोलंदाजीचे आव्हान आवडते. कधी थांबायचे हे जर माझ्यावर अवलंबून असेल तर मला आणखी १० वर्षे खेळायला आवडेल. जोपर्यंत मी संघासाठी योगदान देत आहे आणि माझे शरीर तंदुरूस्त ठेवत आहे तोपर्यंत मी खेळत राहीन. ”
आयपीएलच्या अन्य महत्त्वाच्या बातम्या
कसं काय भावा? अरे, मला कुत्रा चावला; मैदानात उतरताच अर्जुन तेंडुलकरनं दाखवली जखम
गुजरात टायटन्सने पहिला मान पटकावला; ३ जागांसाठी ७ संघांमध्ये सामना रंगला
मृत्यूने कवटाळण्यापूर्वी, मला...: MS Dhoni ने साईन केलेली जर्सी दाखवताना सुनील गावस्कर भावूक
पियूष चावलाने १२ सामन्यांत मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक १९ विकेट्स घेतल्या आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. मोहम्मद शमी ( २३), राशीद खान ( २३) आणि युझवेंद्र चहल ( २१) हे आघाडीवर आहेत.