IPL 2023 PlayOffs Scenario : पहिला टप्पा संपला! Mumbai Indians पायावर धोंडा मारून घेतला; प्ले ऑफच्या शर्यतीत GT, CSK आघाडीवर 

IPL 2023 PlayOffs Scenario : गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात MI ला दारूण पराभव पत्करावा लागला अन् त्यांचा पुढचा मार्ग खडतर झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 11:36 PM2023-04-25T23:36:50+5:302023-04-26T06:34:45+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 PlayOffs Scenario : Chennai Super Kings & Gujarat Titans are the only teams to have 10 points after the 1st half of the league stage; Mumbai Indians out from playoff race? | IPL 2023 PlayOffs Scenario : पहिला टप्पा संपला! Mumbai Indians पायावर धोंडा मारून घेतला; प्ले ऑफच्या शर्यतीत GT, CSK आघाडीवर 

IPL 2023 PlayOffs Scenario : पहिला टप्पा संपला! Mumbai Indians पायावर धोंडा मारून घेतला; प्ले ऑफच्या शर्यतीत GT, CSK आघाडीवर 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023 PlayOffs Scenario : पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये सलग दुसऱ्या पराभवाची नोंद केली. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात MI ला दारूण पराभव पत्करावा लागला अन् त्यांचा पुढचा मार्ग खडतर झाला. IPL 2023 मध्ये आतापर्यंत सर्वच संघांचे ७ सामने खेळून झाले आहेत आणि Point Table पाहता गतविजेता गुजरात आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी प्रत्येकी १० गुणांसह आघाडी घेतली आहे. प्ले ऑफच्या शर्यतीत आयपीएल २०२३च्या पहिल्या टप्प्यात तरी GT व CSK हे संघ आघाडीवर आहेत. चार संघांच्या खात्यात प्रत्येकी ८ गुण आहेत, तर मुंबई इंडियन्सचे ६ गुण आणि उर्वरित तीन संघ प्रत्येकी ४ गुणांवर आहेत.

मुंबई इंडियन्सचा लाजीरवाणा पराभव, गुजरात टायटन्सने पाजले पाणी; ५५ धावांनी जिंकला सामना


प्लेऑफच्या सामने २३ आणि २९ मे दरम्यान चेन्नई व अहमदाबाद येथे खेळवले जातील. क्वालिफायर एक आणि एलिमिनेटर सामना चेन्नईत, तर  क्वालिफायर २ आणि फायनल अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. IPL 2023 Point Table पाहिल्यास चेन्नई सुपर किंग्सचा संघ १० गुणांसह अव्वल स्थानावर आहे. महेंद्रसिंग धोनीच्या संघाने ७ पैकी ५ सामने जिंकलेले आहेत. गुजरात टायटन्सने आज MIला पराभूत करून १० गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. त्यानंतर राजस्थान रॉयल्स ( ४ विजय व ३ पराभव), लखनौ सुपर जायंट्स ( ४ विजय व ३ पराभव) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( ४ विजय व ३ पराभव) हे प्रत्येकी ८ गुणांसह मागे आहेत.


पंजाब किंग्सनेही ४ विजय व ३ पराभव असे निकाल नोंदवताना ८ गुणांसह सहावे स्थान पटकावले आहे. मुंबई इंडियन्स ७ सामन्यांत ३-४ जय-पराभव नोंदवून ६ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या खात्यात प्रत्येकी ४ गुण आहेत. पहिल्या टप्प्यात तरी CSK व GT हे संघ प्ले ऑफच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. ४ गुणांसह तळाच्या तीन स्थानांवर असलेल्या KKR, DC, SHR यांच्यासाठी आता प्रत्येक सामना जिंकणे महत्त्वाचे आहे आणि तरच त्यांचे १८ गुण होतील आणि प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकतील. मुंबई इंडियन्सचीही तिच अवस्था आहे आणि त्यांनी उर्वरित ७ सामने जिंकल्यास त्यांचे २० गुण होतील. पण, या चारही संघांना अन्य संघांच्या कामगिरीवरही अवलंबून राहावे लागणार आहे.

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023 PlayOffs Scenario : Chennai Super Kings & Gujarat Titans are the only teams to have 10 points after the 1st half of the league stage; Mumbai Indians out from playoff race?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.