IPL 2023 PlayOffs Scenario : पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये सलग दुसऱ्या पराभवाची नोंद केली. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात MI ला दारूण पराभव पत्करावा लागला अन् त्यांचा पुढचा मार्ग खडतर झाला. IPL 2023 मध्ये आतापर्यंत सर्वच संघांचे ७ सामने खेळून झाले आहेत आणि Point Table पाहता गतविजेता गुजरात आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी प्रत्येकी १० गुणांसह आघाडी घेतली आहे. प्ले ऑफच्या शर्यतीत आयपीएल २०२३च्या पहिल्या टप्प्यात तरी GT व CSK हे संघ आघाडीवर आहेत. चार संघांच्या खात्यात प्रत्येकी ८ गुण आहेत, तर मुंबई इंडियन्सचे ६ गुण आणि उर्वरित तीन संघ प्रत्येकी ४ गुणांवर आहेत.
मुंबई इंडियन्सचा लाजीरवाणा पराभव, गुजरात टायटन्सने पाजले पाणी; ५५ धावांनी जिंकला सामना
प्लेऑफच्या सामने २३ आणि २९ मे दरम्यान चेन्नई व अहमदाबाद येथे खेळवले जातील. क्वालिफायर एक आणि एलिमिनेटर सामना चेन्नईत, तर क्वालिफायर २ आणि फायनल अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. IPL 2023 Point Table पाहिल्यास चेन्नई सुपर किंग्सचा संघ १० गुणांसह अव्वल स्थानावर आहे. महेंद्रसिंग धोनीच्या संघाने ७ पैकी ५ सामने जिंकलेले आहेत. गुजरात टायटन्सने आज MIला पराभूत करून १० गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. त्यानंतर राजस्थान रॉयल्स ( ४ विजय व ३ पराभव), लखनौ सुपर जायंट्स ( ४ विजय व ३ पराभव) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( ४ विजय व ३ पराभव) हे प्रत्येकी ८ गुणांसह मागे आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"