IPL 2023, Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live : मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर आज अविश्वसनीय विजयाची नोंद केली... रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजयासाठी ठेवलेले २०० धावांचे लक्ष्य मुंबईने १६.३ षटकांत ४ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. सूर्यकुमार यादव आणि नेहल वढेरा यांची १४४ धावांची भागीदारी सामन्यात निर्णायक ठरली. RCBकडून ग्लेन मॅक्सवेल व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी १२० धावांची भागीदारी केली होती, परंतु त्यांच्यावर MIची जोडी भारी पडली. या विजयासोबत मुंबई इंडियन्सने १२ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली, परंतु RCBची अवस्था वाईट झाली. ११ सामन्यानंतर ते १० गुणांसह सातव्या क्रमांकावर आहेत.
ग्लेन मॅक्सवेल आणि फॅफ ड्यू प्लेसिस ( Glenn Maxwell and Faf du Plessis) या जोडीने दणाणून सोडले. दोघांनी ६२ चेंडूंत १२० धावा जोडल्या. मॅक्सवेलने ३३ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ६८ धावा केल्या. जेसन बेहरेनडॉर्फने ४-०-३६-३ अशी अप्रतिम स्पेल टाकली. ४१ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकार खेचून ६५ धावांवर फॅफ झेलबाद झाला. दिनेश कार्तिकने १९ चेंडूंत ३० धावा केल्या. केदार जाधव १२ आणि वनिंदू हसरंगा १२ धावांवर नाबाद राहून संघाला ६ बाद १९९ धावांपर्यंत नेले.
प्रत्युत्तरात इशान किशनने मुंबईला स्फोटक सुरुवात करून दिली. वनिंदू हसरंगाने एकाच षटकात इशान ( ४२) व रोहित शर्माला ( ७) बाद केले. सूर्यकुमार यादव आणि नेहल वढेरा यांनी मुंबईचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६६ चेंडूंत १४० धावांची भागीदारी केली. त्यामुळे मॅच मुंबई इंडियन्सच्या पारड्यात पडली. सूर्या ३५ चेंडूंत ७ चौकार व ६ षटकार खेचून ८३ धावांवर बाद झाला. नेहलने ३४ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारासह ५२ धावा करून मुंबईला १६. ३ षटकांत ४ बाद २०० धावा करून विजय मिळवून दिला.
आयपीएल २०२३ च्या अन्य महत्त्वाच्या बातम्या
अम्पायर्स, RCBची युती झाली; रोहित शर्माची विकेट ढापली? 3m नियमाकडे दुर्लक्ष
अर्जुन तेंडुलकरला ४ सामन्यानंतर Mumbai Indiansने पुन्हा का नाही खेळवलं? जाणून घ्या कारण
नेहल वढेराने खणखणीत षटकार खेचला; TATA ला ५ लाखांचा भुर्दंड बसला
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्ले ऑफसाठी कसे पात्र ठरतील?
- आजच्या पराभवाने RCBच्या प्ले ऑफच्या आशा जवळपास धुळीस मिळवल्या आहेत. पण, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स, पंजाब किंग्स यांचे RCBसारखेच ११ सामन्यानंतर १० गुण आहेत. गुजरात टायटन्स १६ गुणांसह अव्वल स्थानावर आहेत आणि त्यांना एक विजय पुरेसा आहे.
- चेन्नई सुपर किंग्स ११ सामन्यांनंतर १३ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि त्यांना किमान दोन विजय मिळवावे लागतील. पंजाब, कोलकाता, राजस्थान व बंगळुरू यांनी उर्वरित ३ सामने जिंकले तर ते १६ गुणांसह प्ले ऑफमध्ये जाऊ शकतील. त्यामुळे प्ले ऑफमधील एका स्थानासाठी या चार संघांमध्ये खरी चुरस आहे.
Web Title: IPL 2023 playoffs scenario : MI vs RCB Live Marathi : mumbai Indians jump to 3rd in Point Table, How Can RCB Reach Playoffs After Defeat Against Mumbai Indians?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.