सबको मौका मिलेगा...! १० संघाना प्ले ऑफमध्ये पोहचण्याची संधी; जाणून घ्या Points Tableचं समीकरण

IPL 2023: हैदराबाद आणि कोलकाताच्या सामन्यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत बदल झाले आहे. 

By मुकेश चव्हाण | Published: May 5, 2023 08:50 AM2023-05-05T08:50:17+5:302023-05-05T11:28:53+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 Points Table: Kolkata Placed Eighth With 5 Run Win Over Hyderabad | सबको मौका मिलेगा...! १० संघाना प्ले ऑफमध्ये पोहचण्याची संधी; जाणून घ्या Points Tableचं समीकरण

सबको मौका मिलेगा...! १० संघाना प्ले ऑफमध्ये पोहचण्याची संधी; जाणून घ्या Points Tableचं समीकरण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

'हार कर जीतने वाले को बाजीगर कहते है', या आपला संघमालक शाहरूख खान याच्या फिल्मी डायलॉगप्रमाणे खेळ केलेल्या कोलकाता नाइट रायडर्सने जवळपास हातातून गेलेल्या सामन्यात पुनरागमन केले आणि सनरायझर्स हैदराबादचे कडवे स्कोअर कार्ड आव्हान ५ धावांनी परतावले. अखेरच्या चेंडूवर बाजी मारत कोलकाताने लढवय्या खेळ केला. प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ९ बाद १७१ धावा केल्यानंतर कोलकाताने हैदराबादला २० षटकांत ८ बाद १६६ धावांवर रोखले.

धावांचा पाठलाग करताना कर्णधार एडेन मार्करम आणि हेन्रीच क्लासेन हे दक्षिण आफ्रिकन प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर पाचव्या गड्यासाठी ४७ चेंडूंत ७० धावांची भागीदारी केली. दोघे खेळत नितीश राणा झे. गो. मार्करम असेपर्यंत हैदराबाद विजयी मार्गावर होते. १५व्या षटकात क्लासेन, तर त्यानंतर १७व्या षटकात मार्करम बाद झाल्याने हैदराबादने पकड गमावली. हैदराबादला २० चेंडूंत २७ धावांची गरज असताना मार्करम बाद झाला. कोलकाताने येथून मिळवलेली पकड अखेरपर्यंत कायम राखताना रोमांचक विजय मिळवला.

हैदराबाद आणि कोलकाताच्या सामन्यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत बदल झाले आहे. गुजरातचा संघ अजूनही १२ गुणांसह पहिल्या स्थानी आहे. लखनौ दुसऱ्या स्थानी, चेन्नई तिसऱ्या स्थानी, तर राजस्थान चौथ्या स्थानी आहे. आरसीबी १० गुणांसह पाचव्या स्थानी, मुंबई सहाव्या स्थानी, पंजाब सातव्या स्थानी, तर कोलकाता ८ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. हैदराबाद नवव्या स्थानी असून दिल्ली दहाव्या क्रमांकावर आहे. प्लेऑफचा विचार केल्यास हैदराबाद आणि दिल्लीला यापुढील सर्व सामने जिंकणे अनिवार्य आहे. तर सध्या तरी सर्व दहा संघांचा प्लेऑफपर्यंत पोहचण्याची संधी आहे. 

ऑरेंज कॅप

आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस आतापर्यंत ९ सामन्यात ४६६ धावा करून पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध शानदार शतक झळकावणाऱ्या यशस्वी जैस्वालने ९ सामन्यांत ४२८ धावा केल्या असून, तो सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर कॉनवे आहे ज्याने १० सामन्यात ४१४ धावा केल्या आहेत. यानंतर कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. कोहलीने आतापर्यंत ९ सामन्यात ३६४ धावा केल्या आहेत. त्याचवेळी पाचव्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाड आहे. ऋतुराजने सध्या ९ सामन्यांत ३५४ धावा आहेत.

पर्पल कॅप-

मोहम्मद शमी पहिल्या क्रमांकावर आहे. शमीने ९ सामन्यात १७ विकेट्स घेत पर्पल कॅपचा ताबा घेतला आहे. दुसऱ्या क्रमांकावर तुषार देशपांडे आहे. ज्याने १० सामन्यांत १७ विकेट्स घेतल्या आहेत. यानंतर अर्शदीप सिंगचा नंबर लागतो. अर्शदीपने आतापर्यंत १० सामन्यांत १६ विकेट्स घेतल्या आहेत. पियुष चावला चौथ्या क्रमांकावर आहे, चावलाने ९ सामन्यात १५ विकेट्स घेतल्या आहेत. सध्या पाचव्या क्रमांकावर आरसीबीचा मोहम्मद सिराज आहे, ज्याने ९ सामन्यांत १५ बळी घेतले आहेत. राशिदने खानने देखील ९ सामन्यात १५ विकेट घेतल्या असून तो सहाव्या क्रमांकावर आहे.

Web Title: IPL 2023 Points Table: Kolkata Placed Eighth With 5 Run Win Over Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.