IPL 2023 Points Table: अटीतटीच्या झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने शानदार विजय मिळवताना सनरायझर्स हैदराबादला १४ धावांनी नमवले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर मुंबईने २० षटकांत ५ बाद १९२ धावा उभारल्या. यानंतर हैदराबादला १९.५ षटकांत १७८ धावांमध्ये गुंडाळत मुंबईने सलग तिसरा विजय मिळवला आणि गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप घेतली. कॅमरून ग्रीनचा अष्टपैलू खेळ मुंबईच्या विजयात निर्णायक ठरला.
मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामना जिंकत गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. राजस्थान रॉयल्स ५ सामन्यात ४ विजय मिळवत गुणतालिकेत अजूनही अव्वल स्थानी कायम आहे. तर लखनऊ सुपर जायट्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपरकिंग्स तिसऱ्या क्रमांकावर असून गुजरात टायटन्स चौथ्या क्रमांकावर आहे.
पंजाब किंग्स पाचव्या स्थानी आहे. तर मुंबई इंडियन्स सहाव्या स्थानी आहे. कोलकाता नाईट रायडर्स सातव्या स्थानी असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आठव्या क्रमांकावर आहे. सनराजर्स हैदराबाद नवव्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्सने ५ पैकी एकही सामना जिंकलेला नाही, त्यामुळे गुणतालिकेत दिल्लीचा संघ शेवटच्या म्हणजेच दहाव्या स्थानी आहे.
आज राजस्थान विरुद्ध लखनऊ
कामगिरीत सातत्य नसलेल्या लखनौ सुपर जायंट्सला विजयी पथावर पोहोचायचे झाल्यास अव्वल स्थानावर काबीज असलेल्या राजस्थान रॉयल्सला नमविण्यासाठी बुधवारी सर्वच आघाड्यांवर दमदार कामगिरी करावी लागणार आहे. प्रतिभा असली तरी सातत्याअभावी लखनौला पाचपैकी केवळ तीन सामने जिंकण्यात यश आले. राजस्थानने पाचपैकी चार सामने जिंकले. त्यातही ओळीने तीन विजय नोंदविले.