IPL 2023 Points Table Playoff Scenario : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सने बुधवारी दणदणीत विजय मिळवला. घरच्या मैदानावर पंजाब किंग्सकडून झालेल्या मानहानिकारक पराभवाची मुंबईने व्याजासकट वसूली केली. पंजाबने विजयासाठी ठेवलेल २१५ धावांचे लक्ष्य मुंबईने १८.५ षटकांत पार केले. या विजयामुळे Mumbai Indians चे १० गुण झाले आहेत आणि आयपीएल गुणतालिका अधिक चुरशीची झाली आहे. आजचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स हा पावसामुळे रद्द करावा लागल्याने दोघांना १-१ गुण दिला गेला. जाणून घेऊया प्ले ऑफचं गणित...
असा असतो बदला! मुंबईत येऊन ज्याने 'दांडा' तोडला, त्या अर्शदीपला घरी जाऊन तिलक वर्माने झोडला
लखनौ विरुद्ध चेन्नई सामना इकाना स्टेडिवर झाला आणि १९.२ षटकांत ७ बाद १२५ धावा लखनौच्या झाल्या असताना पावसाने एन्ट्री घेतली. जवळपास दोन तास पाऊस थांबण्याची वाट पाहिल्यानंतर सामना रद्द करावा लागला. दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिले गेले. गुजरात टायटन्स १२ गुणांसह अव्वल स्थानावर आहे आणि आजच्या सामन्यानंतर लखनौ व चेन्नई हे संघ प्रत्येकी ११ गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे प्रत्येकी १० गुण असलेले संघ मागे गेले आहेत. त्यात मुंबई इंडियन्सने दुसऱ्या सामन्यात पंजाबवर ६ विकेट्सने विजय मिळवला.
मुंबई इंडियन्सचेही आता १० गुण झाले असून त्यांनी पंजाब किंग्सला सातव्या क्रमांकावर ढकलताना सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद प्रत्येकी ६ गुणांसह प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर जाण्याच्या उंबरठ्यावर आहेत. या तीन संघांसमोर विजय मिळवणे हा एकच पर्यात आहे आणि इतरांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागणार आहे. गुजरात, चेन्नई, लखनौ तसे प्ले ऑफच्या जवळ आहेत, परंतु १० गुणांसह त्यांच्या मागोमाग असलेले चार संघ उलटफेर करू शकतात.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023 Points Table Playoff Scenario: GT with 12 Points, CSK and LSG with 11 Points, RR, MI, RCB and PBKS with 10 Points, KKR, SRH and DC with 6 Points.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.