IPL 2023 Points Table: Orange, Purple Cap रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे; गुणतालिकेत मात्र...! विराट म्हणतो त्यावर संघ कसा हे ठरत नाही

IPL 2023 Points Table: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने  पंजाब किंग्सवर २४ धावांनी विजय मिळवला. RCBच्या १७४ धावांचा पाठलाग करताना PBKSचा संपूर्ण संघ १५० धावांत तंबूत परतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 09:00 PM2023-04-20T21:00:23+5:302023-04-20T21:00:23+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 Points Table - RCB moves to No.5, Orange cap ( Faf Du Plessis ) & Purple cap ( Mohammad Siraj ) are both with RCB now, Virat Kohli said - "The points table can't define your team". | IPL 2023 Points Table: Orange, Purple Cap रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे; गुणतालिकेत मात्र...! विराट म्हणतो त्यावर संघ कसा हे ठरत नाही

IPL 2023 Points Table: Orange, Purple Cap रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे; गुणतालिकेत मात्र...! विराट म्हणतो त्यावर संघ कसा हे ठरत नाही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023 Points Table: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने  पंजाब किंग्सवर २४ धावांनी विजय मिळवला. RCBच्या १७४ धावांचा पाठलाग करताना PBKSचा संपूर्ण संघ १५० धावांत तंबूत परतला. मोहम्मद सिराजने २१ धावांत ४ विकेट्स घेतल्या, तर वनिंदू हसरंगाने दोन विकेट्स घेतल्या. आजच्या सामन्यात फॅफ ड्यू प्लेसिसनेही दमदार फलंदाजी केली, थोडक्यात त्याचे शतक हुकले. पण, फॅफ ड्यू प्लेसिस व मोहम्मद सिराज या RCBच्या खेळाडूंनी आज आयपीएल २०२३ मधील अनुक्रमे ऑरेंज व पर्पल कॅप स्वतःच्या नावे केली. RCB नेही गुणतालिकेत चांगली सुधारणा केली, परंतु विराट कोहलीच्या मते गुणतालिकेतील स्थानावरून संघ कसा हे ठरत नाही. 

दिल तो बच्चा है जी! विराट कोहली- ग्लेन मॅक्सवेल DRS ब्रेकमध्ये खेळत होते Stone-Paper-Scissors

फॅफ ड्यू प्लेसिस ( ८४) आणि विराट कोहली ( ५९) या दोघांनी ९८ चेंडूंत १३७ धावांची भागीदारी केली. पण, अन्य फलंदाजांनी निराश केल्याने  RCB ला ४ बाद १७४ धावांवर समाधान मानावे लागले. पंजाबच्या हरप्रीत ब्रारने दोन विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज ( ४-२१) आणि वनिंदू हसरंगा ( २ ) यांनी प्रभावी गोलंदाजी केली. विराटने घेतलेले दोन DRS हे यशस्वी ठरले. पंजाबकडून प्रभसिमरन सिंग ( ४६) व जितेश शर्मा ( ४१) यांनी चांगला खेळ केला. पंजाबचा संपूर्ण संघ १५० धावांवर तंबूत परतला अन् बंगळुरूने २४ धावांनी सामना जिंकला. या विजयानंतर RCB ने गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली.

Image
Orange cap ची शर्यत

  • फॅफ ड्यू प्लेसिस - ३४३ धावा ( ६ सामने)
  • विराट कोहली - २७९ धावा ( ६ सामने)
  • जॉस बटलर - २४४ धावा ( ६ सामने)
  • वेंकटेश अय्यर - २३४ धावा ( ६ सामने)
  • शिखर धवन - २३३ धावा  ( ४ सामने) 

 

Purple cap ची शर्यत

  • मोहम्मद सिराज - १२ विकेट्स ( ६ सामने)
  • मार्क वूड - ११ विकेट्स  ( ४ सामने)
  • युझवेंद्र चहल - ११ विकेट्स ( ४ सामने)
  • राशीद खान - ११ विकेट्स ( ५ सामने)
  • मोहम्मद शमी - १० विकेट्स ( ४ सामने)

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023 Points Table - RCB moves to No.5, Orange cap ( Faf Du Plessis ) & Purple cap ( Mohammad Siraj ) are both with RCB now, Virat Kohli said - "The points table can't define your team".

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.