IPL 2023 Points Table: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाब किंग्सवर २४ धावांनी विजय मिळवला. RCBच्या १७४ धावांचा पाठलाग करताना PBKSचा संपूर्ण संघ १५० धावांत तंबूत परतला. मोहम्मद सिराजने २१ धावांत ४ विकेट्स घेतल्या, तर वनिंदू हसरंगाने दोन विकेट्स घेतल्या. आजच्या सामन्यात फॅफ ड्यू प्लेसिसनेही दमदार फलंदाजी केली, थोडक्यात त्याचे शतक हुकले. पण, फॅफ ड्यू प्लेसिस व मोहम्मद सिराज या RCBच्या खेळाडूंनी आज आयपीएल २०२३ मधील अनुक्रमे ऑरेंज व पर्पल कॅप स्वतःच्या नावे केली. RCB नेही गुणतालिकेत चांगली सुधारणा केली, परंतु विराट कोहलीच्या मते गुणतालिकेतील स्थानावरून संघ कसा हे ठरत नाही.
दिल तो बच्चा है जी! विराट कोहली- ग्लेन मॅक्सवेल DRS ब्रेकमध्ये खेळत होते Stone-Paper-Scissors
फॅफ ड्यू प्लेसिस ( ८४) आणि विराट कोहली ( ५९) या दोघांनी ९८ चेंडूंत १३७ धावांची भागीदारी केली. पण, अन्य फलंदाजांनी निराश केल्याने RCB ला ४ बाद १७४ धावांवर समाधान मानावे लागले. पंजाबच्या हरप्रीत ब्रारने दोन विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज ( ४-२१) आणि वनिंदू हसरंगा ( २ ) यांनी प्रभावी गोलंदाजी केली. विराटने घेतलेले दोन DRS हे यशस्वी ठरले. पंजाबकडून प्रभसिमरन सिंग ( ४६) व जितेश शर्मा ( ४१) यांनी चांगला खेळ केला. पंजाबचा संपूर्ण संघ १५० धावांवर तंबूत परतला अन् बंगळुरूने २४ धावांनी सामना जिंकला. या विजयानंतर RCB ने गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली.
- फॅफ ड्यू प्लेसिस - ३४३ धावा ( ६ सामने)
- विराट कोहली - २७९ धावा ( ६ सामने)
- जॉस बटलर - २४४ धावा ( ६ सामने)
- वेंकटेश अय्यर - २३४ धावा ( ६ सामने)
- शिखर धवन - २३३ धावा ( ४ सामने)
Purple cap ची शर्यत
- मोहम्मद सिराज - १२ विकेट्स ( ६ सामने)
- मार्क वूड - ११ विकेट्स ( ४ सामने)
- युझवेंद्र चहल - ११ विकेट्स ( ४ सामने)
- राशीद खान - ११ विकेट्स ( ५ सामने)
- मोहम्मद शमी - १० विकेट्स ( ४ सामने)
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"