घरच्या मैदानावर खेळताना चेन्नई सुपरकिंग्जने यंदाच्या आयपीएलमध्ये आपले गुणांचे खाते उघडताना लखनऊ सुपरजायंट्स संघाला १२ धावांनी नमवले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर चेन्नईने २० षटकांत ७ बाद ११७ धावा उभारल्या. यानंतर त्यांनी लखनऊला २० षटकांत ७ बाद २०५ धावांवर रोखले. मोईन अलीने ४ बळी घेत चेन्नईच्या विजयात निर्णायक भूमिका निभावली. यासह चेन्नईने गुणांचे खातेही उघडले.
चेन्नईने लखनऊचा पराभव केल्यानंतर आयपीएल गुणतालिकेमध्ये मोठा बदल झाला आहे. विजयानंतर चेन्नईचा संघ सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यापूर्वी चेन्नईचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर होता. दोन सामन्यांत एक विजय आणि एक पराभवानंतर चेन्नईकडे दोन गुण आहेत. लखनौ संघाने पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. चेन्नई विरुद्धच्या सामन्याआधी लखनौ संघ दुसऱ्या क्रमांकावर होता, मात्र चेन्नईकडून झालेल्या पराभवानंतर हा संघ दुसऱ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.
चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाचा फायदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला देखील झाला आहे. पराभव झाल्याने लखनऊ संघाची दूसऱ्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने तिसऱ्या स्थानावरुन दूसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. राजस्थान रॉयल्स संघ अजूनही पहिल्या स्थानावर आहे. चौथ्या स्थानावर गुजरात टायटन्स आणि पाचव्या क्रमांकावर पंजाब किंग्स संघ आहे. सहाव्या क्रमांकावर चेन्नई आहे. कोलकाता नाइट रायडर्स सातव्या क्रमांकावर, तर मुंबई इंडियन्स आठव्या क्रमांकावर, दिल्ली कॅपिटल्स नवव्या क्रमांकावर आणि सनरायझर्स हैदराबाद दहाव्या क्रमांकावर आहे.
आज दिल्ली विरुद्ध गुजरात
स्थळ : अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली, वेळ: सायं. ७.३० वाजेपासून
पहिला सामना गमावणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला मंगळवारी घरच्या मैदानावर विजय नोंदविण्याचे अवघड आव्हान असेल. त्यासाठी गुजरात टायटन्सच्या फलंदाजांवर नियंत्रण मिळवावे लागणार आहे. गुजरातकडे शुभमन गिल, हार्दिक पांड्या, राहुल तेवतिया, विजय शंकर आणि अष्टपैलू राशीद खान असे धडाकेबाज फलंदाज आणि मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ यासारखे गोलंदाज आहेत.