IPL 2023 Points Table: मुंबई इंडियन्सनेराजस्थान रॉयल्सचा 6 गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यात रोहित शर्माच्या संघाला विजयासाठी 214 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मुंबईच्या संघाने 19.3 षटकात 4 विकेट गमावत 214 धावा करून सामना जिंकला. या विजयानंतर मुंबई इंडियन्सचे 8 गुण झाले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने ४ सामने जिंकले आहेत, तर ४ सामने गमावले. या विजयानंतर मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत सातवा क्रमांक पटकावला.
टॉप 4 मध्ये कोण?
मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर राजस्थानची गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तर लखनौ सुपर जायंट्स दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. मात्र, गुजरात टायटन्स पहिल्या क्रमांकावर कायम आहे. गुजरात टायटन्सचे 8 सामन्यांतून 12 गुण आहेत. याशिवाय चौथ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्ज आणि पाचव्या क्रमांकावर पंजाब किंग्जचा संघ आहे. लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज या तीन संघांचे 10-10 गुण आहेत.
गुणतालिकेत उर्वरित संघांची अवस्था
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. आरसीबीचे 8 सामन्यांत 8 गुण आहेत. कोलकाता नाईट रायडर्स गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. केकेआरचे 9 सामन्यांतून 6 गुण आहेत. तर सनरायझर्स हैदराबाद नवव्या क्रमांकावर आहे. SRH चे 8 सामन्यांतून 6 गुण आहेत. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स शेवटच्या क्रमांकावर आहे. डीसीचे 8 सामन्यांतून 4 गुण आहेत. गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ आयपीएल 2023 हंगामातील टॉप-4 संघांमध्ये आहेत.