IPL 2023 Points Table: पंजाबने घेतली मोठी झेप, हरलेला मुंबई इंडियन्स कितव्या क्रमांकावर... पाहा IPL पॉईंट्स टेबल

पंजाबने शेवटच्या षटकात मुंबईचा केला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 10:40 AM2023-04-23T10:40:11+5:302023-04-23T10:40:42+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 Points Table Update Punjab take a big leap and Mumbai Indians down by 2 spots after loss see all teams position | IPL 2023 Points Table: पंजाबने घेतली मोठी झेप, हरलेला मुंबई इंडियन्स कितव्या क्रमांकावर... पाहा IPL पॉईंट्स टेबल

IPL 2023 Points Table: पंजाबने घेतली मोठी झेप, हरलेला मुंबई इंडियन्स कितव्या क्रमांकावर... पाहा IPL पॉईंट्स टेबल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023 Points Table, Mumbai Indians vs Punjab Kings: आयपीएलच्या 16 व्या मोसमात, पंजाब किंग्ज (PBKS) ने मुंबई इंडियन्सचा (MI) घरच्या मैदानावर 13 धावांनी पराभव करून या मोसमातील चौथा विजय नोंदवला. पंजाब किंग्जचा संघ आता गुणतालिकेत 5 व्या स्थानावर पोहोचला आहे, ज्यामध्ये संघाचे आता 8 गुण आहेत, तर निव्वळ धावगती -0.162 आहे. या हंगामात पंजाब संघाने आतापर्यंत 7 सामने खेळले असून त्यापैकी 3 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

पंजाबच्या संघाचा टॉप-5 मध्ये दिमाखदार प्रवेश

पॉइंट टेबलमधील 31 साखळी सामने संपल्यानंतर सर्व संघांची स्थिती पाहिली तर राजस्थान रॉयल्स संघ आतापर्यंत 6 पैकी 4 सामने जिंकून टॉप-4 मध्ये पहिल्या स्थानावर आहे. राजस्थान संघाचा निव्वळ धावगती सध्या 1.043 आहे. यानंतर, लखनौ सुपर जायंट्सचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने आतापर्यंत 7 लीग सामने खेळून 4 सामने जिंकले आहेत आणि या क्षणी संघाचा निव्वळ धावगती 0.547 आहे. चेन्नई सुपर किंग्जचा संघ 8 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे, ज्यामध्ये संघाने आतापर्यंत 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि त्यांचा निव्वळ धावगती 0.355 आहे. गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर गुजरात टायटन्स संघ आहे, ज्याने 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि संघाचा निव्वळ धावगती 0.212 आहे. शनिवारच्या विजयानंतर पंजाबचा संघ ६ पैकी ३ विजयांसह ६ गुणांसह पाचव्या स्थानी आहे. त्यांनी २ स्थानांची झेप घेतली आहे.

मुंबई सातव्या स्थानी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ 6 गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे, तर आता मुंबई इंडियन्सचा संघ 7व्या स्थानावर आला आहे. आतापर्यंत 6 सामने खेळल्यानंतर, मुंबई संघाने 3 जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत, ज्यामध्ये संघाचा निव्वळ धावगती -0.254 आहे. कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या 3 स्थानावर आहेत. जिथे हैदराबाद आणि कोलकाताचे ४-४ गुण आहेत, तर दिल्ली अजूनही २ गुणांवर आहे.

Web Title: IPL 2023 Points Table Update Punjab take a big leap and Mumbai Indians down by 2 spots after loss see all teams position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.