IPL 2023 Prize Money Break-up details: इंडियन प्रीमिअर लीग २०२३ हा हंगाम तीन दिवस रंगलेल्या फायनलनंतर मंगळवारी मध्यरात्री संपुष्टात आला. २८ मे रोजी होणारी फायनल सोमवारी २९ मे रोजी सुरू झाली, परंतु ती संपण्यास ३० मेची मध्यरात्र उलटली. चेन्नई सुपर किंग्सने ५ विकेट्सने गुजरात टायटन्सवर विजय मिळवून पाचवे आयपीएल जेतेपद नावावर केले. जेतेपदासह CSKला २० कोटींचे बक्षीस दिले गेले, तर उप विजेत्या गुजरात टायटन्सला १३ कोटी दिले गेले. पण, पुरस्कारार्थींमध्ये शुबमन गिलचा ( Shubman Gill) दबदबा राहिला. त्याने एकूण चार पुरस्कार जिंकले.
चेन्नई सुपर किंग्स - २० कोटीगुजरात टायटन्स - १३ कोटीमुंबई इंडियन्स ( तिसरे ) - ७ कोटीलखनौ सुपर जायंट्स ( चौथे) - ६.५ कोटीEmerging Player of the tournament: यशस्वी जैस्वाल ( ६२५ धावा) - १० लाखOrange Cap: शुबमन गिल ( ८९० धावा) - १० लाखPurple Cap: मोहम्मद शमी ( २८ विकेट्स) - १० लाखMost Valuable Player: शुबमन गिल ( ८९० धावा) - १० लाखTiago ev electric Super Striker of the Season: ग्लेन मॅक्सवेल - १० लाखGame Changer of the Season: शुबमन गिल ( ८९० धावा) - १० लाखFours of the season - शुबमन गिल ( ८५ चौकार) - १० लाखLogest six of the season - फॅफ ड्यू प्लेसिस - १० लाखCatch of the season - राशीद खान - १० लाखFair play Awards - दिल्ली कॅपिटल्स - १० लाख