IPL 2023 Prize Money : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ची फायनल उद्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन तगड्या संघांमध्ये होणार आहे. गुजरातला जेतेपद कायम राखून इतिहास घडविण्याची, तर चेन्नईला मुंबई इंडियन्सच्या ५ जेतेपदांची बरोबरी करण्याची संधी आहे. आयपीएल २०२३ मध्ये एकूण ४६.५ कोटींची बक्षीस दिली जाणार आहेत. त्यापैकी विजयी संघाला २०, तर उप विजेत्याला १३ कोटी दिले जातील. तिसऱ्या स्थानावर समाधानी राहिलेल्या मुंबई इंडियन्सला ७ आणि चौथ्या क्रमांकावरील लखनौ सुपर जायंट्सला ६.५ कोटी मिळणार आहेत. याशिवाय ऑरेंज व पर्पल कॅप विजेत्यांवरही लाखो रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव होणार आहे.
२०१० ते २०१३ या कालावधीत विजेत्या संघाला १० आणि उपविजेत्या संघाला ५ कोटी दिले गेले. २०१४ ते २०१५ मध्ये विजेत्या संघासाठीची रक्कम १५ आणि उप विजेत्यांची १० कोटी करण्यात आली होती. २०१६ ते २०१९ या कालावधीत विजेत्या संघाला २० व उपविजेत्याला ११ कोटी दिले गेले. कोरोना काळात ही बक्षीस रक्कम निम्मी केली गेली. त्यानंतर २०२१ व २०२२ मध्ये पुन्हा बक्षीस रक्कम मी २० व १३ कोटी केली गेली.
Orange Cap साठी शर्यत
- शुबमन गिल - ८५१
- फॅफ ड्यू प्लेसिस - ७३०
- विराट कोहली - ६३९
- यशस्वी जैस्वाल - ६२५
- डेव्हॉन कॉनवे - ६२५
PURPLE CAP शर्यत
- मोहम्मद शमी - २८ विकेट्स
- राशीद खान - २७ विकेट्स
- मोहित शर्मा - २४ विकेट्स
- पियूष चावला - २२ विकेट्स
- युझवेंद्र चहल - २१ विकेट्स
IPL Prize Money Break-up:
- विजेता संघ - २० कोटी
- उप विजेता संघ - १३ कोटी
- मुंबई इंडियन्स ( तिसरे ) - ७ कोटी
- लखनौ सुपर जायंट्स ( चौथे) - ६.५ कोटी
- Emerging Player of the tournament: २० लाख
- Orange Cap: १५ लाख
- Purple Cap: १५ लाख
- Most Valuable Player: १२ लाख
- Power Player of the Season: १५ लाख
- Super Striker of the Season: १५ लाख
- Game Changer of the Season: १२ लाख
Web Title: IPL 2023 Prize Money For Winner, Runner-up, Orange, And Purple Cap Holder and others awards
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.