ऋषभ पंत विना खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्ससाठी यंदाचा हंगाम खूप खराब जात आहे. दिल्लीने सलग चार सामन्यांत पराभव सहन केल्यावर शनिवारी आरसीबीविरुद्ध तरी विजयी खाते उघडेल, अशी आशा होती. मात्र, दिल्लीचा आरसीबीविरुद्ध देखील पराभव झाला. तर लखनऊ सुपर जायट्सविरुद्ध पंजाब किंग्सने विजय मिळवल्याने आयपीएलच्या गुणतालिकत मोठे बदल झाले आहे.
एकूण ४ पैकी ३ सामने जिंकत राजस्थान रॉयल्स ६ गुणांसह गुणतालिकत अव्वल स्थानावर आहे. तर तर लखनऊ सुपर जायट्स ५ सामन्यात ३ सामने जिंकत ६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. गुजरात टायटन्स तिसऱ्या क्रमांकावर असून पंजाब किंग्स चौथ्या क्रमांकावर आहे. कोलकाता नाइट रायडर्स पाचव्या क्रमांकावर, तर चेन्नई सुपर किंग्स सहाव्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सातव्या क्रमांकावर, सनराइस हैदराबाद आठव्या क्रमांकावर, मुंबई इंडियन्स नवव्या क्रमांकावर आणि दिल्ली कॅपिटल्स दहाव्या क्रमांकावर आहे.
ऑरेंज कॅप
शिखर धवन ४ सामने खेळून २३३ धावा करून पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्याकडे ऑरेंज कॅप आहे. दुसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर आहे ज्याने ५ कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे, कोहलीने ४ सामन्यात एकूण २१४ धावा केल्या आहेत. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत ३ अर्धशतके ठोकली आहेत. याशिवाय राजस्थानचा जोस बटलर चौथ्या क्रमांकावर आहे. बटलरने आतापर्यंत ४ सामन्यात २०४ धावा नोंदवल्या आहेत. यानंतर नंबर येतो. ऋतुराज गायकवाड, ज्याने आतापर्यंत ४ सामन्यात १९७ धावा केल्या आहेत. तो ५व्या क्रमांकावर आहे.
पर्पल कॅप
मार्क वूडने ४ सामन्यात ११ विकेट्स घेतल्या आहेत आणि त्याच्याकडे पर्पल कॅप आहे. दुसऱ्या क्रमांकावर राजस्थानचा युजवेंद्र चहल आहे. चहलने आतापर्यंत ४ सामन्यात १० विकेट्स घेत पर्पल कॅपचा ताबा घेतला आहे. रशीद खान तिसऱ्या क्रमांकावर आहे, राशिनने ४ सामन्यात ९ विकेट्स घेतल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर रवी बिश्नोई आहे ज्याने ५ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या आहेत. अर्शदीप सिंगही पाचव्या क्रमांकावर आहे. अर्शदीपने ५ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या आहेत.