Join us  

IPL 2023, Qualifier 1 : LSG vs KKR च्या निकालापूर्वीच IPLने २ संघांना दिली फायनलसाठी दोन संधी  

IPL 2023, Qualifier 1 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी अनुक्रमे १८ व १७ गुणांसह प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 9:02 PM

Open in App

IPL 2023, Qualifier 1 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी अनुक्रमे १८ व १७ गुणांसह प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. अन्य संघांचे गुण पाहता गतविजेत्या गुजरातचे क्वालिफायर १ मध्ये खेळणार हे निश्चित आहे. पण, दुसऱ्या संघासाठी CSK ला लखनौ सुपर जायंट्सचे आव्हान आहे. LSG आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात इडन गार्डनवर सामना सुरू आहे. हा सामना लखनौने ९७ धावांनी जिंकल्यास ते नेट रन रेटच्या जोरावर क्वालिफायर १मध्ये खेळतील हे पक्कं आहे. पण, हा सामना सुरू असताना IPL ने क्वालिफायर १ साठीचे दोन संघ जाहीर केले आहेत.

ऋतुराज ( ५० चेंडूंत ३ चौकार व ७ षटकारांसह ७९ धावा) आणि डेव्हॉन ( ५२ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह ८७ धावा) यांनी १४१ धावांची भागीदारी करताना CSKचा पाया मजबूत केला. कॉनवे व शिवम दुबे ( २२) यांनी २२ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी पूर्ण केली. रवींद्र जडेजा ( २०*) आणि धोनी ( ५) यांनी अखेरच्या दोन षटकांत २२ धावा जोडून संघाला ३ बाद २२३ धावांपर्यंत पोहोचवले. ही दिल्लीतील दुसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरली. २०११ मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सने ४ बाद २३१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ५८ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह ८६ धावा करून एकहाती किल्ला लढवला.  दीपक चहर ( ३-२२), महिष तीक्षणा ( २-२३) आणि मथिशा पथिराणा ( २-२२) यांनी उत्तम गोलंदाजी केली.

आयपीएलने या सामन्यानंतर वेळापत्रक अपडेट केलं आणि त्यात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात २३ मे रोजी क्वालिफायर १ सामना होईल असे जाहीर केलं. हा सामना चेन्नईच्या घरच्या मैदानावर चेपॉकवर होणार आहे. या लढतीतील विजेता संघ थेट अहमदाबाद येथे २८ मे रोजी होणाऱ्या फायनलमध्ये खेळेल, तर पराभूत संघ एलिमिनेटरमधील विजेत्या संघाविरुद्ध अहमदाबाद येथे २६ मे रोजी खेळेल. 

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्सगुजरात टायटन्सलखनौ सुपर जायंट्स
Open in App