IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi : चेन्नई सुपर किंग्सच्या १७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची सुरुवात चांगली झाली नाही. वृद्धीमान साहा व हार्दिक पांड्या पॉवर प्लेमध्येच माघारी परतले. पण, फॉर्मात असलेला शुबमन गिल ( Shubman Gill) एकहाती खिंड लढवतोय आणि त्याने मोठ्या विक्रमाची नोंद केली. विराट कोहलीनंतर असा पराक्रम करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला.
ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांच्या दमदार सुरुवातीनंतरही चेन्नईला मोठी धावसंख्या गाठता आली नाही. ऋतुराज ४४ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ६० धावांवर माघारी परतला आणि ८७ धावांची भागीदारी संपुष्टात आली. कॉनवेने ४० धावा केल्या. ऋतुराजच्या विकेटनंतर गुजरातच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करताना शिवम दुबे, अजिंक्य रहाणे या फॉर्मात असलेल्या फलंदाजांना झटपट माघारी पाठवले. तरीही अंबाती रायुडू ( १७) व रवींद्र जडेजा ( २२) यांनी शेवटच्या षटकात सुरेख फटके मारताना ७ बाद १७२ धावांपर्यंत संघाला पोहोचवले. महेंद्रसिंग धोनी १८व्या षटकात आला आणि चेपॉकवर जल्लोष झाला, परंतु त्याला १ धावेवर माघारी जाताना पाहून स्मशान शांतता पसरली. मोहम्मद शमी व मोहित शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. ( CSK vs GT Live Scoreboard मराठीत)
ऋतुराज गायकवाडचा सोपा झेल, अम्पायरने केला 'गेम'; हार्दिक नशिबावर हसला
CSKच्या गोलंदाजांनी सुरुवातीला चांगला मारा केला, तुषार देशपांडेच्या दुसऱ्या षटकात शुबमन गिलचा झेल घेण्यासाठी दीपक चहरने सूर मारला, परंतु GT फलंदाज थोडक्यात बचावला. दीपकच्या पुढच्या षटकात शुबमनने षटकाराने स्वागत केले, परंतु त्याच षटकात दीपकने GTच्या वृद्धीमान साहाला (१२) माघारी पाठवले. हार्दिक पांड्याला ( ८) महिष तीक्षणाने फिरकीवर फसवून माघारी पाठवले. पॉवर प्लेमध्ये गुजरातचे २ फलंदाज ४१ धावांवर माघारी परतले. शुबमन चांगले फटके मारताना दिसला अन् त्याने यंदाच्या पर्वात ७००+ धावांचा टप्पा ओलांडला. विराट कोहलीनंतर ( २०१६) असा पराक्रम करणारा तो दुसरा भारतीय ठरला. विराटने ९७३ धावा केल्या होत्या आणि आयपीएलच्या एकाच पर्वातील या सर्वाधिक धावा आहेत.
Web Title: IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live Marathi : Indian Batters to have 700+ runs in an IPL season: Virat Kohli - 973 (2016) & Shubman Gill - 704* (2023)
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.