Join us  

IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live : मथिशा पथिराणाला गोलंदाजी करण्यापासून अम्पायरने रोखले, MS Dhoni ने वाचा काय केले

IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi : चेन्नई सुपर किंग्स दमदार कामगिरी करताना गुजरात टायटन्सला बॅकफूटवर फेकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 11:05 PM

Open in App

IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स दमदार कामगिरी करताना गुजरात टायटन्सला बॅकफूटवर फेकले. त्यांचे ६ फलंदाज माघारी पाठवून CSK ने सामन्यावर पकड घेतली, परंतु राशीद खान व विजय शंकर हे संघर्ष करताना दिसत आहेत. दरम्यान, मथिशा पथिराणाला १६व्या षटकापूर्वी गोलंदाजी करण्यापासून अम्पायरने रोखले. 

CSKच्या गोलंदाजांनी चांगला मारा करताना वृद्धीमान साहा (१२) आणि हार्दिक पांड्या ( ८)  यांना पॉवर प्लेमध्येच माघारी पाठवले. फॉर्मात असलेल्या विजय शंकरला मागे ठेवून गुजरातने दासून शनाकाला ( १७) पुढे पाठवले, परंतु त्यानेही काहीच कमाल नाही केली. रवींद्र जडेजाने ११व्या षटकात शनाकाला आणि नंतर डेव्हिड मिलरचा ( ४) त्रिफळा उडवून गुजरातला मोठा धक्का दिला. त्याने ४-०-१८-२ अशी स्पेल टाकली. धोनीने त्यानंतर चहरला पुन्हा गोलंदाजीला आणले अन् त्याने शुबमनची ( ४२)  विकेट मिळवून दिली. राहुल तेवातिया व विजय शंकर यांच्यावर आता जबाबदारी होती. पण, तीक्षणाने अप्रतिम चेंडूवर तेवातियाचा ( ३) दांडा उडवला.  तीक्षणा ४-०-२८-२ आणि चहरने ४-०-२९-२ अशी अप्रतिम गोलंदाजी केली.  ( CSK vs GT Live Scoreboard मराठीत

 

शुबमन गिल आजही चमकला, विराटनंतर त्याने मोठा पराक्रम केला

ऋतुराज गायकवाडचा सोपा झेल, अम्पायरने केला 'गेम'; हार्दिक नशिबावर हसला

रवींद्र जडेजाने ऐतिहासिक कामगिरीसह गुजरातची 'झोप' उडवली, ५ फलंदाज परतले माघारी

गुजरातला ३० चेंडूंत ७१ धावा करायच्या होत्या आणि हातात ४ विकेट्स होत्या. मथिशा पथिराणाची दिशाहीन गोलंदाजी धोनीची डोकेदुखी वाढवताना दिसली. दरम्यान, १६व्या षटकापूर्वी पंचांनी पथिराणाला गोलंदाजी करण्यापासून रोखले.  कारण तो बराच वेळ मैदानावर नव्हता आणि त्यामुळे गोलंदाजीला येताच तो जितका वेळ मैदानाबाहेर होता तोपर्यंत त्याला रोखले गेले. त्यानंतर पंच आणि कर्णधारांनी ही वेळ संपेपर्यंत गप्पा मारल्या आणि पाथिराणा गोलंदाजी करण्यास पात्र ठरला.   

टॅग्स :आयपीएल २०२३महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सगुजरात टायटन्स
Open in App