IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi : ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे या सलामीवीरांनी चेन्नई सुपर किंग्सला पुन्हा एकदा चांगली सुरूवात करून दिली. ऋतुराजची दुसऱ्या षटकात विकेट पडली होती, परंतु No Ball असल्याने गुजरात टायटन्सला विकेट मिळाली नाही. आजच्या सामन्यात प्रेक्षकांना स्कोअर बोर्डवर नवं काहीतरी दिसलं अन् त्याने सर्वांचे डोकं चक्रावलं. जाणून घेऊया नेमकं काय झालं...
गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आयपीएल २०२३ चा क्वालिफायर १ सामना होत आहे. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातने यश दयालच्या जागी दर्शन नळकांडेची निवड केली. दर्शनने त्याच्या पहिल्या षटकात CSKला मोठा धक्का दिला होता. तिसऱ्या चेंडूवर ऋतुराज गायकवाडचा सोपा झेल शुबमन गिलने टिपला गेला. ऋतुराज पेव्हेलियनच्या दिशेने जातच होता, पण तितक्यात अम्पायरने त्याला रोखले अन् एकच जल्लोष सुरू झाला. कारण, दर्शनचा तो चेंडू No Ball ठरला. ऋतुराज व डेव्हॉन कॉनवे यांना रोखण्यासाठी GT ने पाचव्या षटकात राशीद खानला आणले. यंदाच्या पर्वात गुजरातने सर्वाधिक ९६ विकेट्स काढल्या आहेत आणि त्यापैकी ४८ विकेट्स या राशीद व शमी या दोघांनी मिळून घेतल्या आहेत. ( CSK vs GT Live Scoreboard मराठीत)
ऋतुराज गायकवाडचा सोपा झेल, अम्पायरने केला 'गेम'; हार्दिक नशिबावर हसला
नूर अहमदच्या चेंडूवर कट मारण्याच्या प्रयत्नात कॉनवेचा झेल उडाला होता, परंतु दासून शनाकाची झेप अपूरी ठरली अन् cskला चौकार मिळाला. चेन्नईने पॉवर प्लेमध्ये बिनबाद ४९ धावा केल्या. ऋतुराज व कॉनवे यांनी अर्धशतकी भागीदारी केली. आयपीएल २०२३ मधील प्ले ऑफच्या सामन्यातील प्रत्येक डॉट बॉलसाठी टाटा समूह व बीसीसीआय ५०० झाडं लावणार आहेत. त्यामुळे संघासाठी धावा करायच्या की पर्यावरण संवर्धनासाठी डॉट बॉल खेळायचा, असा प्रश्न नक्कीच फलंदाजांना पडला असेल.