IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi : महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) यानेच यंदाच्या आयपीएलमध्ये हवा केली, कारण हे त्याचे शेवटचे वर्ष असल्याची जोरदार चर्चा आहे. कोरोना काळात होम-अवे फॉरमॅट न झाल्याने चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधाराने चेपॉकवर खेळून चाहत्यांचे आभार मानायची, इच्छा व्यक्त केली होती. आयपीएल २०२३ मध्ये ती पूर्ण झाली आणि त्यामुळेच आजचा सामना हा त्याचा घरच्या मैदानावरील शेवटचा सामना आहे. त्यामुळे स्टेडियमवर फक्त आणि फक्त धोनी... धोनी... धोनी... हेच ऐकायला मिळाले. त्याचवेळी धोनी याहीवेळेस निवृत्तीच्या 'गुगली' सीमापार भिरकावतो की, थांबतो हे जाणून घेण्यासाठी सर्वच उत्सुक होते. सामन्यानंतर हर्षा भोगले यांनी ही गुगली फेकलीच अन्...
२०१९महेंद्रसिंग धोनी - होपफुली, येस२०२०महेंद्रसिंग धोनी - डेफिनेटली, नॉट२०२१ महेंद्रसिंग धोनी - अजूनही क्रिकेट शिल्लक आहे२०२२महेंद्रसिंग धोनी - चेपॉकच्या चाहत्यांना गुडबाय नाही म्हटले तर त्यांच्यावर अन्याय होईल.२०२३ तुम्ही हे ठरवून टाकलंय की ही माझी शेवटची आयपीएल आहे ( CSKच्या चेपॉकवरील अखेरचा साखळी सामना)
सामन्यानंतर धोनी म्हणाला, आणखी एक फायनल असं म्हणणं चुकीचं ठरेल. आम्ही यासाठी दोन महिने प्रचंड मेहनत घेतली आहे. प्रत्येकाने योगदान दिले आहे. मधल्या फळीला पुरेशी संधी मिळाली नाही. आज टॉस गमावणे चांगले ठरले. जडेजाला अशी खेळपट्टी मिळाली, तर त्याचा सामना करणे अवघडच आहे. त्याने मोईन अलीसोबत केलेली भागीदारीही विसरता कामा नये.
- हर्षा भोगले - तू पुन्हा चेपॉकवर येईल आणि खेळशील का?
- महेंद्रसिंग धोनी - ऑक्शनला आणखी ८-९ महिने आहेत. चेन्नई सुपर किंग्ससाठी मी नेहमी उपलब्ध आहे, पण हा निर्णय घेण्यासाठी अजून बराच कालावधी आहे. मग मी आताच डोकेदुखी कशाला ओढावून घेऊ. चेन्नई सुपर किंग्सला जे माझ्याकडून अपेक्षित आहे, मग ते मैदानावर असो किंवा मैदानाबाहेर मी नेहमीच उपलब्ध आहे.
ऋतुराज गायकवाड ( ६०) आणि डेव्हॉन कॉनवे ( ४०) यांनी ८७ धावांची भागीदारी करून चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली. अजिंक्य रहाणे ( १७), अंबाती रायुडू ( १७) व रवींद्र जडेजा ( २२) यांनी शेवटच्या षटकात सुरेख फटके मारताना ७ बाद १७२ धावांपर्यंत संघाला पोहोचवले. प्रत्युत्तरात गुजरातकडून शुबमन गिल ( ४२) आणि राशीद खान ( ३०) हे दोघं वगळता अन्य फलंदाजांनी निराश केले. चेन्नईच्या गोलंदाजांनी खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी केली अन् धोनीच्या क्षेत्ररक्षणाच्या सेटींगने त्यांना मदत मिळाली. दीपक चहर ( २-२९), महीष तीक्षणा ( २-२८), रवींद्र जडेजा ( २-१८) व मथिशा पथिराणा ( २-३७) यांनी उत्तम मारा केला. गुजरातचा संपूर्ण संघ १५७ धावांत तंबूत परतला.