Join us  

IPL 2023, Qualifier 1 scenarios : लखनौ सुपर जायंट्ससमोर CSKला मागे टाकण्यासाठी 'कठीण' गणित; महत्त्वाचे समीकरण 

IPL 2023, Qualifier 1 scenarios : चेन्नईने प्ले ऑफमधील स्थान पक्के केले, परंतु १७ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर असूनही त्यांचे क्वालिफायर १ मधील स्थान पक्के झालेले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 7:40 PM

Open in App

IPL 2023, Qualifier 1 scenarios : चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये शनिवारी दिल्ली कॅपिटल्सवर ७७ धावांनी विजय मिळवला. CSK ने विजयासाठी ठेवलेल्या २२४ धावांचा पाठलाग करताना DC ला ९ बाद १४६ धावाच करता आल्या. या विजयासह चेन्नईने प्ले ऑफमधील स्थान पक्के केले, परंतु १७ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर असूनही त्यांचे क्वालिफायर १ मधील स्थान पक्के झालेले नाही. लखनौ सुपर जायंट्स हेही क्वालिफायर १च्या शर्यतीत आहेत आणि आता कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध त्यांनी अवघड गणित सोडवल्यास ते CSKला मागे टाकून पुढे जाऊ शकतात.

ऋतुराज ( ५० चेंडूंत ३ चौकार व ७ षटकारांसह ७९ धावा) आणि डेव्हॉन ( ५२ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह ८७ धावा) यांनी १४१ धावांची भागीदारी करताना CSKचा पाया मजबूत केला. कॉनवे व शिवम दुबे ( २२) यांनी २२ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी पूर्ण केली. रवींद्र जडेजा ( २०*) आणि धोनी ( ५) यांनी अखेरच्या दोन षटकांत २२ धावा जोडून संघाला ३ बाद २२३ धावांपर्यंत पोहोचवले. ही दिल्लीतील दुसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरली. २०११ मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सने ४ बाद २३१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ५८ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह ८६ धावा करून एकहाती किल्ला लढवला.  दीपक चहर ( ३-२२), महिष तीक्षणा ( २-२३) आणि मथिशा पथिराणा ( २-२२) यांनी उत्तम गोलंदाजी केली.

चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएलमधील प्रवास २००८- उप विजेते२००९ - उपांत्य फेरी२०१०- विजेते२०११- विजेते२०१२- उप विजेते २०१३- उप विजेते२०१४ - प्ले ऑफ२०१५ - उप विजेते२०१८ - विजेते२०१९ उप विजेते२०२०- साखळी फेरी२०२१- विजेते२०२२- साखळी फेरी२०२३ प्ले ऑफ

क्वालिफायर १ साठी रस्सीखेचगुजरात टायटन्सने १३ सामन्यांत १८ गुणांची कमाई करताना क्वालिफायर १ मधील आपले स्थान पक्के केले आहे. चेन्नई सुपर किंग्स १७ गुणांसह ०.६५२ अशा नेट रन रेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. लखनौ सुपर जायंट्सने आज कोलकाता नाइट रायडर्सला नमवल्यास त्यांचेही १७ गुण होतील, परंतु त्यांचा नेट रन रेट सध्या ०.३०४ असा आहे. त्यांना CSKला मागे टाकण्यासाठी नेट रन रेट सुधरावा लागेल आणि त्यासाठी त्यांना KKR वर ९७ धावांनी विजय मिळवावा लागेल. तरच ते क्वालिफायर १ मध्ये खेळतील. अन्यथा गुजरात विरुद्ध चेन्नई हा क्वालिफायर १ चा सामन चेपॉकवर होईल. 

आज लखनौ पराभूत झाल्यास मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू त्यांचा अखेरचा साखळी सामना जिंकून प्ले ऑफमध्ये प्रवेश करतील. त्यामुळे लखनौला MI व RCB यांच्यापैकी एकाचा पराभव वाचवू शकतो.  

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्सलखनौ सुपर जायंट्स
Open in App