IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live : १७ चेंडूंत ८८ धावा! शुबमन गिलने चमत्कार केला ना भावा, रोहित शर्मानेही केलं कौतुक

IPL 2023, Qualifier 2 Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : शुबमन गिलने ( Shubman Gill) ने आज आयपीएलमधील बरेच विक्रम मोडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 09:39 PM2023-05-26T21:39:03+5:302023-05-26T21:39:51+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live Marathi : 129 RUNS OFF JUST 60 BALLS FOR SHUBMAN GILL.  with 7 fours and 10 sixes, Video  | IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live : १७ चेंडूंत ८८ धावा! शुबमन गिलने चमत्कार केला ना भावा, रोहित शर्मानेही केलं कौतुक

IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live : १७ चेंडूंत ८८ धावा! शुबमन गिलने चमत्कार केला ना भावा, रोहित शर्मानेही केलं कौतुक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Qualifier 2 Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : शुबमन गिलने ( Shubman Gill) ने आज आयपीएलमधील बरेच विक्रम मोडले. इंडियन प्रीमिअर लीग २०२३मध्ये तिसरे शतक झळकावताना शुबमनने आज गुजरात टायटन्सचा डोलारा एकहाती सांभाळला. टीम डेव्हिड आणि तिलक वर्मा यांनी सोडलेले त्याचे झेल मुंबई इंडियन्सला महागात पडले. शुबमनने क्रिकेटच्या नोटबूकमधले सर्व फटके अगदी सहजतेने मारून MIच्या गोलंदाजांना हतबल केले. 


मुंबई इंडियन्से प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि शुबमन आणि वृद्धीमान साहा ( १८) यांनी चांगली सुरुवात करताना सामन्यावर पकड घेतली. सातव्या षटकात पियूष चावलाने GTला धक्का दिला. साहा ( १८) फटका मारण्यासाठी पुढे आला अन् पियूषने टाकलेला चेंडू डाव्या बाजूने यष्टिरक्षक इशान किशनने टिपून स्टम्पिंग केले. ८व्या षटकात कुमार कार्तिकेयाचा चेंडू शुबमनने पूल मारला, हा झेल झाला असता पण तिलक वर्माची फिल्डींग खास झाली नाही. रोहित शर्मा त्यामुळे नाराज झाला. शुबमनने आज मुंबई इंडियन्सचे यशस्वी गोलंदाज पियूष व आकाश मढवाल यांनाही नाही सोडले.  शुबमनने ४९ चेंडूंत ४ चौकार व ८ षटकारांसह यंदाच्या पर्वातील तिसरे शतक झळकावले. 


साई सुदर्शनने दुसऱ्या विकेटसाठी शुबमनसह शतकी भागीदारी केली. शुबमनचा प्रत्येक फटका आज वाखाण्यजोग होता आणि त्यात कोणताच आक्रसताळेपणा नव्हता. तंत्रशुद्ध फलंदाजी कशी करावी अन् मनगटाचा सुरेख वापर करून चेंडू कसा भिरकावा हे आज शुबमनने दाखवून दिले. त्याचे फटके नेत्रदिपक होते अन् रोहितनेही त्याचे कौतुक केले. १६व्या षटकात टाईम आऊटमध्ये ख्रिस जॉर्डनचा कोपरा इशान किशनच्या डोळ्यावर आदळला अन् त्याने लगेच मैदान सोडले. १७व्या षटकात मढवालने MIला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. शुबमन ६० चेंडूंत ७ चौकार व १० षटकारांसह १२९ धावांवर झेलबाद झाला. 
 

Web Title: IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live Marathi : 129 RUNS OFF JUST 60 BALLS FOR SHUBMAN GILL.  with 7 fours and 10 sixes, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.