IPL 2023, Qualifier 2 Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : शुबमन गिलने ( Shubman Gill) ने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी आज निर्दयीपणे धुलाई केली... आयपीएलमध्ये सलग दोन शतक झळकावणाऱ्या शुबमनने आज गुजरात टायटन्ससाठी पुन्हा वादळी खेळी केली. पावसाच्या फटकेबाजीनंतर अहमदाबादच्या खेळपट्टीवर शुबमनचे वादळ घोंगावले. शुबमनच्या ( वि. RCB) शतकामुळे मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये आले होते आणि आज त्याने त्यांचीही धुलाई केली.
शुबमन गिलची नववी धाव, साऱ्यांना केलं गपगार! मुंबई इंडियन्सने दिले जीवदान
मुंबई इंडियन्से प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण, गुजरात टायटन्सचे सलामीवीर शुबमन गिल आणि वृद्धीमान साहा यांनी सावध सुरुवात करताना सामन्यावर पकड घेतली. शुबमनने नववी धाव पूर्ण करून ऑरेंज कॅप नावावर केली. त्याच्या ७३१* धावा झाल्या आहेत. RCBच्या फॅफ ड्यू प्लेसिसला ( ७३०) गिलने आज मागे टाकले. विराट कोहली ( ६३९), यशस्वी जैस्वाल ( ६३५) आणि डेव्हॉन कॉनवे ( ६२५) हे यंदाच्या पर्वात सर्वाधिक धावा करणारे पाच फलंदाजांमध्ये आहेत. गुजरातने ६ षटकांत बिनबाव ५० धावा चढवल्या, पण सातव्या षटकात पियूष चावलाने GTला धक्का दिला. साहा ( १८) फटका मारण्यासाठी पुढे आला अन् पियूषने टाकलेला चेंडू डाव्या बाजूने यष्टिरक्षक इशान किशनने टिपून स्टम्पिंग केले.
८व्या षटकात कुमार कार्तिकेयाचा चेंडू शुबमनने पूल मारला, हा झेल झाला असता पण तिलक वर्माची फिल्डींग खास झाली नाही. रोहित शर्मा त्यामुळे नाराज झाला. शुबमनने त्यानंतर पियूषने टाकलेला चेंडू सीमापार भिरकावला. शुबमनने यासह अहमदाबादवर ४५२+ धावांचा टप्पा ओलांडला. आयपीएलच्या एका पर्वात एकाच मैदानावर ४००+ धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरला. विराट कोहलीने बंगळुरूत २०१६ मध्ये ५९७, ख्रिस गेलने २०१३मध्ये बंगळुरूवर ५३२ आणि डेव्हिड वॉर्नरने २०१९मध्ये हैदराबादवर ४३३ धावा केल्या होत्या. शुबमनने ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि हे आयपीएल २०२३मधील त्याचे पाचवे अर्धशतक ठरले. त्यानंतर त्याने खणखणीत षटकार खेचून १० षटकांत संघाला १ बाद ९१ धावांपर्यंत पोहोचवले.
शुबमनची फटकेबाजी रोहित शर्माची डोकेदुखी वाढवत होती आणि त्यात त्याने MIचा मॅच विनर गोलंदाज मढवाल यालाही एका षटकात तीन खणखणीत षटकार चोपले. पुढील षटकात पियूषचे चेंडूही त्याने सीमापार पाठवले. साई सुदर्शननेही त्याला उत्तम साथ दिली. शुबमनने ४९ चेंडूंत ४ चौकार व ८ षटकारांसह यंदाच्या पर्वातील तिसरे शतक झळकावले.
Web Title: IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live Marathi : 3RD IPL CENTURY FOR SHUBMAN GILL, He smashed 100* runs from 49 balls against Mumbai Indians in big match for GT
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.