Join us  

IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live : गुजरात टायटन्स-चेन्नई सुपर किंग्स जेतेपदासाठी भिडणार; मुंबई इंडियन्सचे पॅकअप

IPL 2023, Qualifier 2 Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : शुबमन गिलच्या शतकामुळे प्ले ऑफमध्ये पोहोचलेल्या मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्सच्या याच फलंदाजाने स्पर्धेबाहेर फेकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 11:57 PM

Open in App

IPL 2023, Qualifier 2 Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : शुबमन गिलच्या शतकामुळे प्ले ऑफमध्ये पोहोचलेल्या मुंबई इंडियन्सलागुजरात टायटन्सच्या याच फलंदाजाने स्पर्धेबाहेर फेकले. क्वालिफायर २ लढतीत शुबमनने शतक झळकावताना २३३ धावांचा डोंगर उभा केला. त्यात मुंबई इंडियन्सला सलामीवीर इशान किशन याला दुखापतीमुळे फलंदाजीला येता आले नाही. रोहित शर्माची बॅट किमान आज तरी चालेल अशी अपेक्षाही फोल ठरली. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा व कॅमेरून ग्रीन या तिघांनी संघर्ष दाखवला, परंतु चुकीचा शॉट मारण्याच्या प्रयत्नांत तिघांचाही दांडा उडाला. गुजरात टायटन्सने हा सामना जिंकून सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. २८ मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवरच गुजरातला चारवेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्सचा सामना कराव लागणार आहे. 

मुंबई इंडियन्सला धक्क्यांमागून धक्के बसले.  इम्पॅक्ट खेळाडू नेहर वढेरा ( ४) मोहम्मद शमीच्या पहिल्याच षटकात माघारी परतला. कॅमेरून ग्रीनला दुसऱ्या षटकात हार्दिक पांड्याने रिटायर्ड हर्ट केले. त्यानंतर शमीने दुसरा धक्का देताना रोहित शर्माला ( ८) झेलबाद केले. इशान फलंदाजीला येणार नसल्याचे फ्रँचायझीने जाहीर केले अन् कन्कशन सबस्टीट्यूड म्हणून विष्णू विनोद फलंदाजीला येणार आहे. तिलक वर्मा व सूर्यकुमार यादव यांनी मुंबईचा डाव सावरला. तिलकवने ५व्या षटकात मोहम्मद शमीला ४,४,४,४,२,६ अशा २४ धावा चोपून काढल्या. या दोघांनी २१ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली. राशीद खानने सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तिलकचा दांडा उडवला. तिलक ४३ ( १४ चेंडू) धावावंर बाद झाला अन् मुंबईच्या ३ बाद ७२ धावा झाल्या. 

मोहम्मद शमीने आयपीएल इतिहासात पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक १७ विकेट्स घेण्याचा विक्रम यंदा नोंदवला. त्याने ट्रेंट बोल्ट ( २०२०) व मिचेल जॉन्सन ( २०१३) यांचा १६ विकेट्सचा विक्रम मोडला.  ग्रीन मैदानावर आल्याने मुंबई इंडियन्सला आशेचा किरण दिसू लागला होता. त्याने सूर्यकुमार यादवसह मुंबईच्या धावांची गती सुसाट ठेवली होती आणि त्यांनी १० षटकांत ३ बाद ११० धावा फलकावर चढवल्या. ३२ चेंडूंत ५१ धावांची ही भागीदारी जॉश लिटलने तोडली अन् ग्रीन ३० धावांवर त्रिफळाचीत झाला. ( कॅमेरून ग्रीनची विकेट पाहा )  मुंबईला ४८ चेंडूंत १०८ धावा करायच्या होत्या. डेव्हिड मिलर आणि मोहित शर्मा यांनी अप्रतिम क्षेत्ररक्षण करून गुजरातसाठी धावा अडवल्या. लिटलच्या पुढच्या षटकात विष्णू विनोदचा झेल उडाला. शमी उलटा पळत सुटला होता, परंतु झेल पकडू शकला नाही.

सूर्यकुमारने ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. सूर्याची फटकेबाजी पाहून मुंबईला आशेचा किरण दिसू लागला होता आणि त्यांना ३६ चेंडूंत ८६ धावा करायच्या होत्या. मोहित शर्माला गोलंदाजीला आणले गेले अन् सूर्याने त्याचे षटकाराने स्वागत केले. पण, पुढच्याच चेंडूवर हार्दिकचा प्लान यशस्वी ठरला. ३८ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ६१ धावा कुटणाऱ्या सुर्याचा सुपला मारण्याच्या प्रयत्नात मोहितने दांडा उडवला. ( पाहा सूर्यकुमार यादवची विकेट )  त्याच षटकात विष्णू विनोद ( ५) सोपा झेल देऊन माघारी परतला. मोहितच्या या षटकाने सामना फिरला. राशीद खानने पुढच्या षटकात टीम डेव्हिडला पायचीत करून गुजरातचा विजय पक्का केला. मोहितने पुढच्या षटकात ख्रिस जॉर्डनला माघारी पाठवून मुंबईचा आठवा फलंदाज माघारी पाठवला. मोहितने २.२-०-१०-५ अशी स्पेल टाकली. मुंबईचा संपूर्ण संघ १७१ धावांत तंबूत परतला. गुजरातने ६२ धावांनी सामना जिंकला.

तत्पूर्वी, शुबमन गिलने ( Shubman Gill) आज मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. त्याने ६० चेंडूंत ७ चौकार व १० षटकारांसह १२९ धावा चोपल्या. शुबमन आणि वृद्धीमान साहा ( १८) यांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर शुबमन व साई सुदर्शनसह ६४ चेंडूंत १३८ धावा जोडल्या. सुदर्शनला ४३ ( ३१ चेंडू) धावांवर रिटायर्ड आऊट व्हावे लागले, राशीद खान मैदानाव आला अन् त्याने चांगले फटके मारले. हार्दिकने १३ चेडूंत २८ धावा करताना गुजरातला ३ बाद २३३ धावांपर्यंत पोहोचवले. 

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सगुजरात टायटन्स
Open in App