Join us  

इशान किशन सलामीला का नाही आला? कॅमेरून ग्रीन retired hurt अन् रोहित शर्मा बाद झाला

IPL 2023, Qualifier 2 Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : मुंबई इंडियन्सला २३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे आता अवघडच झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 10:33 PM

Open in App

IPL 2023, Qualifier 2 Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : मुंबई इंडियन्सला २३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे आता अवघडच झाले आहे. गुजरात टायटन्सच्या फलंदाजीच्या वेळी इशान किशनला दुखापत झाली अन् त्याने मैदान सोडले. त्यामुळे तो सलामीलाही येऊ शकला नाही. त्यात कॅमेरून ग्रीनही retired hurt होऊन माघारी परतल्याने मुंबईचा संघ अडचणीत सापडला. त्यात रोहित शर्मानेही विकेट फेकली. 

शुबमन गिलने ( Shubman Gill) आज मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. त्याने ६० चेंडूंत ७ चौकार व १० षटकारांसह १२९ धावा चोपल्या. शुबमन आणि वृद्धीमान साहा ( १८) यांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर त्यानंतर शुबमन व साई सुदर्शन यांचाच बोलबाला राहिला. साई सुदर्शनने दुसऱ्या विकेटसाठी शुबमनसह ६४ चेंडूंत १३८ धावांची भागीदारी केली.  शुबमच्या फटकेबाजीने मुंबईचे गोलंदाज गांगरले होते आणि सुदर्शन व हार्दिक पांड्या यांनी याचा पूरेपूर फायदा उचलला. सुदर्शनला ४३ ( ३१ चेंडू) धावांवर रिटायर्ड आऊट व्हावे लागले, राशीद खान मैदानाव आला अन् त्याने चांगले फटके मारले.  राशीद खान मैदानाव आला अन् त्याने चांगले फटके मारले. हार्दिकने १३ चेडूंत २८ धावा करताना गुजरातला ३ बाद २३३ धावांपर्यंत पोहोचवले. 

शुबमन गिलचे ऐतिहासिक शतक! १२९ धावांच्या खेळीने मोडले ५ मोठे विक्रम

लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला धक्क्यांमागून धक्के बसले. GTच्या डावात १६व्या षटकानंतर स्ट्रॅटेजिक टाईमच्या वेळी ख्रिस जॉर्डनचा कोपरा इशान किशनच्या डोळ्यावर आदळला अन् त्याला मैदान सोडावे लागले. त्यानंतर तो सलामीला आलाच नाही. इम्पॅक्ट खेळाडू नेहर वढेरा ( ४) मोहम्मद शमीच्या पहिल्याच षटकात माघारी परतला. कॅमेरून ग्रीनला दुसऱ्या षटकात हार्दिक पांड्याच्या चेंडूने दुखापतग्रस्त केले. चेंडू जोरात ग्रीनच्या हातावर आदळला अन् त्याला रिटायर्ड हर्ट व्हावे लागले. त्यानंतर शमीने दुसरा धक्का देताना रोहित शर्माला ( ८) झेलबाद केले. 

टॅग्स :आयपीएल २०२३इशान किशनमुंबई इंडियन्सरोहित शर्मागुजरात टायटन्स
Open in App