IPL 2023, Qualifier 2 Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चा दुसरा फायनलिस्ट आज मिळणार आहे. गतविजेता गुजरात टायटन्स आणि पाचवेळचा विजेता मुंबई इंडियन्स यांच्यात क्वालिफायर २ सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. क्वालिफायर १मध्ये GTवर विजय मिळवून चेन्नई सुपर किंग्सने फायनलमध्ये प्रवेश केला होता, तर एलिमिनेटरमध्ये MI ने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केले होते. पण, नाणेफेक सुरू होण्यास अर्ध्या तासाचा वेळ आहे, परंतु पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सामन्याला विलंब होऊ शकतो.
पावसाची बॅटींग सुरूच राहिल्यास किंवा उशीरा पाऊस थांबल्यास ५-५ षटकांचा सामना खेळवला जाऊ शकतो किंवा सुपर ओव्हरमध्ये विजेता ठरवला जाऊ शकतो. तेही शक्य न झाल्यास गुजरात टायटन्स जे गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर होते ते फायनल खेळतील. मध्यरात्री १२.५० पर्यंत सुपर ओव्हर सुरू केली जाऊ शकते.
पावसामुळे सामना झालाच नाही तर...?
IPL च्या नियमांनुसार, पात्रता फेरी रद्द झाल्यास, गुजरात टायटन्स संघाला फायनलमध्ये CSKच्या संघाविरूद्ध खेळायची संधी मिळणार आहे. तर पावसाचा फटका बसल्याने मुंबई इंडियन्सला संधी न मिळताच स्पर्धेतून बाद व्हावे लागेल. पावसामुळे सामना रद्द झाल्यास लीग टेबलमध्ये अधिक गुण मिळवणारा संघ थेट अंतिम फेरीत खेळतो. IPLच्या साखळी फेरीत १० सामने जिंकल्यानंतर गुजरात संघ २० गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. मुंबईला १४ सामन्यांत ८ सामने जिंकत १६ गुणच मिळवता आले होते. त्यामुळे अशा परिस्थितीत क्वालिफायर-2 पावसामुळे रद्द झाल्यास गुजरात टायटन्स संघ अंतिम फेरीत खेळेल.