Join us  

IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live : मै बोला वही! रोहित शर्माने नाणेफेक जिंकून, हार्दिकला असं का म्हटलं?

IPL 2023, Qualifier 2 Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या क्वालिफायर २ सामन्याने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची धाकधुक वाढवली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 7:49 PM

Open in App

IPL 2023, Qualifier 2 Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या क्वालिफायर २ सामन्याने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची धाकधुक वाढवली होती. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाने हजेरी लावल्याने लढतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. पण, ७.४५ ला नाणेफेक झाली अन् ८ वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे. त्यामुळे एकही षटक कमी केलं जाणार नाही. 

बीसीसीआयने सुरुवातीला दिलेल्या अपडेट्स नुसार ७.२० वाजता मैदानाची पाहणी झाली. रोहित शर्मा व आशिष नेहरा यांनी खेळपट्टीची पाहणी केली. मॅच रेफरी व पंचही मैदानावर आले आणि पाहणी केल्यानंतर त्यांनी दोन्ही कर्णधारांची चर्चा केली. त्यानुसार आता ७.४५ वाजता नाणेफेक घेण्याचा आणि ८ वाजता सामना सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला. ग्राऊंड्समन्सनीही सॉपरचा वापर करून झटपट मैदान सुकवले. सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी हार्दिक पांड्याने गुजरातच्या खेळाडूंचे प्रोत्साहन वाढवले.  हार्दिकने टॉस उडवला आणि रोहितने नाणेफेक जिंकली. रोहितने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

 टॉसपूर्वी दोन्ही कर्णधारांचं बोलणं सुरू होतं आणि टॉस जिंकताच रोहितने मै बोला वही, असं हार्दिककडे बघून म्हटले. टॉस जिंकताच प्रथम गोलंदाजी करण्याचा दोन्ही कर्णधारांचा विचार होता.  खेळपट्टी ओली असल्याने त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न असल्याचे रोहितने म्हटले. युवा खेळाडूंमध्ये आत्मविश्वास भरलेला आहे आणि त्यामुळेच आम्ही धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये हृतिक शोकिनच्या जागी कुमार कार्तिकेय परतला आहे.  दासून शनाकाच्या जागी जॉश लिटल आणि साई सुदर्शन दर्शन नळकांडेच्या जागी गुजरातच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये परतले आहेत. 

मुंबई इंडियन्सचा संघ - रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा,  कॅमेरून ग्रीन, टीम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पियूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेया, आकाश मढवाल 

गुजरात टायटन्सचा संघ - वृद्धीमान साहा, शुबमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, राशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी 

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सगुजरात टायटन्स
Open in App