Join us  

IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live : शुबमन गिलची नववी धाव, साऱ्यांना केलं गपगार! मुंबई इंडियन्सने दिले जीवदान

IPL 2023, Qualifier 2 Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : पावसामुळे खेळपट्टी ओली असेल आणि त्यामुळे मुंबई इंडियन्से प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 8:30 PM

Open in App

IPL 2023, Qualifier 2 Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : पावसामुळे खेळपट्टी ओली असेल आणि त्यामुळे मुंबई इंडियन्से प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण, गुजरात टायटन्सचे सलामीवीर शुबमन गिल आणि वृद्धीमान साहा यांनी सावध सुरुवात करताना सामन्यावर पकड घेतली. सलग दोन शतकं ठोकणाऱ्या शुबमनने आज ९वी धाव घेत आयपीएल २०२३ मध्ये सर्व फलंदाजांना गपगार केले. सहाव्या षटकात टीम डेव्हिडने डाईव्ह मारून झेलसाठी प्रयत्न केला, परंतु शुबमनला जीवदान मिळाले.

पावसामुळे क्वालिफायर २ सामन्याला विलंब होईल अशी भीती होती, परंतु नियोजित ८ वाजता सामना सुरू झाला. टॉस जिंकून रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टी ओली असल्याने त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न असल्याचे रोहितने म्हटले. युवा खेळाडूंमध्ये आत्मविश्वास भरलेला आहे आणि त्यामुळेच आम्ही धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये हृतिक शोकिनच्या जागी कुमार कार्तिकेय परतला आहे. दासून शनाकाच्या जागी जॉश लिटल आणि साई सुदर्शन दर्शन नळकांडेच्या जागी गुजरातच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये परतले आहेत. 

वृद्धीमान साहा आणि शुबमन गिल यांनी सावध खेळावर भर दिला. गिलने नववी धाव पूर्ण करून ऑरेंज कॅप नावावर केली. त्याच्या ७३१* धावा झाल्या आहेत. RCBच्या फॅफ ड्यू प्लेसिसला ( ७३०) गिलने आज मागे टाकले. विराट कोहली ( ६३९), यशस्वी जैस्वाल ( ६३५) आणि डेव्हॉन कॉनवे ( ६२५) हे यंदाच्या पर्वात सर्वाधिक धावा करणारे पाच फलंदाजांमध्ये आहेत.  रोहितने यशस्वी गोलंदाज आकाश मढवालला चौथ्या षटकात आणले अन् त्याचा अप्रतिम बाऊन्सर साहाच्या हेल्मेटवर जोरात आदळला. गुजरातची वैद्यकिय टीम लगेच मैदानावर धावली. पण, साहाने प्राथमिक उपचार घेऊन पुढचाच चेंडू चौकार खेचला. गुजरातने ६ षटकांत बिनबाव ५० धावा केल्या. 

 

टॅग्स :आयपीएल २०२३शुभमन गिलमुंबई इंडियन्सगुजरात टायटन्स
Open in App